झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल:- घराच्या गच्चीवर धुतलेले कपडे वाढण्यासाठी टाकत असलेल्या महिलेच्या वीज वितरण कंपनीच्या तारांना स्पर्श झाल्याने शॉक लागून महिला मयत झाल्याची घटना दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास भवानीनगर परिसरात घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की रामदास काशिनाथ भोई, मीराबाई रामदास भोई,सुरेश रामदास भोई,यांची पत्नी व मुले सह राहतात,सकाळी पती रामदास भोई,मुलगा सुरेश भोई,सून हे सर्व कामावर निघून गेले, व मीराबाई हे सुध्दा बोमील, झिंगे विक्री करण्याचे काम करतात
घरातील सर्वजन कामावर निघून गेल्यामुळे आंघोळ करून धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी गच्चीवर गेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांच्या गच्चीवरून वीज वितरण कंपनीचे तार गेलेले आहेत या तारांना स्पर्श झाल्याने मिराबाई रामदास भोई वय 70 वर्षे गच्चीवर पडल्या परिसरातील राहिवाश्यानी आरोडारोड केल्या मुळे शेजारी रहात असलेले अरुण सुखदेव भोई यांचेसह इतर घराच्या गच्चीवर चढले असता त्या ठिकाणी मीराबाई यांच्या उजवा तळहात जळालेला दिसला म्हणून त्यांनी शेजारी राहत असलेले नातेवाईक संजय तुकाराम भोई, दिलीप चावदस भोई व इतर यांच्या मदतीने मीराबाई यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी हलवण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कैलास पाटील यांनी मीराबाई यांना तपासले असता ते मयत झाल्याचे घोषित करण्यात आले. डॉक्टर मुकेश चौधरी यांनी त्यांच्यावर शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले सायंकाळी मीराबाई यांचेवर अंतिम संस्कार करण्यात आले
याबाबत एरंडोल पोलीस स्थानकात अरुण सुखदेव भोई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसारआकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अनिल पाटील हे पुढील तपास करीत आहे.
मिराबाई रामदास भोई यांच्या पश्चात पती, मुलगा,सून, नातवंडे असा गरीब व कष्टकरी परिवार आहे.
मुलगा व पती हे नदीवर मासे पकडून विक्री करतात तर सून शेतात मोलमजुरी करतेय व स्वतः मीराबाई ह्या गावात बोंबील झिंगे विक्री करण्याचे काम करतात.
लटकलेल्या तारांमुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे एका निष्पाप व वृद्ध महिलेचा बळी गेल्याची चर्चा परिसरात होती.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






