प्रतिनिधी – संतोष कदम.
शिरसटवाडी :- ( ता. इंदापूर ) शिर सटवाडी गावामध्ये सालाबाद प्रमाणे श्रावणी बैलपोळा साजरा करण्यात येतो. इंदापूर तालुक्यात आखाडी बेंदूर अथवा भाद्रपद महिन्यात बैलपोळा साजरा होतो. परंतु शिरसटवाडी गावामध्ये हा श्रावण महिन्यामध्ये साजरा होतो . त्यास ऐतिहासिक परंपरा आहे .

बैलपोळा हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय घरातील आबालवृद्ध लहान मुलं सर्वच बळीराजांनी केलेल्या वर्षभराच्या कष्टाची
उत्तराई करण्यासाठी बैलपोळा सण साजरा करतात.
शेतकरी राजा हा आपले सर्जा राजाला धुवून स्वच्छ आंघोळ घालून रंगीबेरंगी रंगाने नटवुन शिंगांना बेगिडे तर व शेंडीला रंगवून अंगावरती रंगीबेरंगी साज चढवून हलगी वादनाच्या तुर्याच्या उताऱ्यांच्या उत्साहात फटाक्यांची आतीशबाजी करून बैलांची मिरवणूक शिरसटवाडी गावामधुन काढण्यात येते . मारुतीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून प्रत्येक शेतकऱ्याच्या घरापुढे देशी गाई व बैल जोडी उभा करून त्याचे पूजन केले जाते. जसा लग्न समारंभ असतो, तसा बळीराजाचा लग्न सोहळा सुद्धा आयोजित करतात .

सर्जा राजाला प्रथम पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. ही जुनी परंपरा शिरसटवाडी गावामध्ये आज रोजी युवा पिढी जोपासताना दिसते. शिरसटवाडी गावातील कदम वस्ती येथे शेतकरी बुवासाहेब आबाजी कदम यांचे कुटुंबांच्या वतीने घरातील स्वप्निल कदम ,संग्राम कदम ,अमर कदम तर मुली स्वप्नाली कदम, प्रणिता कदम ,तेजल कदम ,आणि कुटुंबीयांनी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






