शासनाच्या ७५ वर्षावरील नागरिकांना एस. टी ने मोफत प्रवास योजनेचा प्रथम लाभ दोघे आजीबाईना. वाहतूक नियंत्रक,चालक व वाहकांनी केले आजीचे स्वागत…

Spread the love

सोयगाव दि.२६ ) शासनाच्या ७५ वर्षावरील नागरिकांना एस. टी ने मोफत प्रवास या योजनेचा शुभारंभ मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आला. सोयगाव आगाराच्या एस. टी ने मोफत प्रवास करण्याचा प्रथम मान सोयगाव येथील सुमन शिवराम जोहरे व पळसखेडा येथील बिराबाई फकिरा रेकनोद या दोघ आजीबाईंना मिळाला. सकाळी साडे नऊ वाजता सोयगाव येथून पाचोरा जाणारी एस. टी. क्रमांक एम एच १४ बीटी २६४७ या सोयगाव आगाराच्या एस टी ने सोयगाव बसस्थानकावरून सुमन शिवराम जोहरे वय ७६ वर्षे यांनी शेंदूरणी तर बिराबाई फकिरा रेकनोद (रा.पळसखेडा ता.सोयगाव) यांनी पाचोरा येथे जाण्यासाठी एस टीत प्रवेश केला

त्यावेळी या दोघ आजीबाईंचे एस.टी वाहतूक नियंत्रक रमेश पायघन, एस. टी वाहक निलेश पाटील व चालक एस. एस मोरे यांनी स्वागत केले. तर वाहक निलेश पाटील यांनी आजीबाईना एस. टी चे मोफत तिकीट दिले यावेळी आजीबाईंनी मोफत प्रवास करण्याचा प्रथम मान मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार