दौंड ( प्रतिनिधी । रवी देसाई) : दौंड येथे एका सोळा वर्षाच्या मुलीने आई रागवल्यामुळे भीमा नदीपात्रात उडी मारून आत्महत्त्या केली असल्याची माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. सदरच्या मुलीने दौंड-मनमाड लोहमार्गाच्या पुलाजवळील नदीपात्रात उडी मारली. मात्र नदीला पाणी जास्त व प्रवाहाला वेग असल्यामुळे सदरची मुलगी वाहत जाऊन अनगर (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) या गावच्या हद्दीत नदीकाठी तिचा मृतदेह सापडला. सदरच्या घटनेमुळे दौंड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान अशा घटना घडत असताना पालकांनी आपल्या मुलांना समजून घेऊन किंवा त्यांच्याशी संवाद साधून मुलांवरच्या मनावरचा तान हलका केला पाहिजे, जेणेकरून पालक आणि पाल्यांमध्ये एक भावनिक नात तयार झालं पाहिजे. कारण लहान मुलांचं वय हे वाढत वय असतं. मातीला जसा आकार द्यावा, तशा पद्धतीने ती आकार घेत असते.
पालकांनी आपल्या धावपळीच्या कामातून वेळ काढून लहान मुलांना वेळ देणंही तेवढच गरजेचे आहे. त्यांच्याशी सुसंवाद साधणं. आपल्या अपेक्षेचं ओझं त्यांच्यावर न लादता त्यांचंही ऐकून घेणं हे महत्त्वाचं आहे. जेणेकरून अशा घटनांना आळा बसू शकेल, हीच माफक अपेक्षा. दरम्यान यासदंर्भात घटनेची नोंद करण्याचे काम श्रीगोंदा पोलिसांत सुरू होते.






