राज्यात सध्या मुळ शिवसेना आणि शिंदे शिवसेना गट यांच्या वाद सुरू आहे. या वादाचे पडसाद पोलीस आयुक्तालयांकडून गणेश उत्सवानिमित्त आयोजित समन्वय बैठकीत पडले.
औरंगाबाद :- पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गणोशोत्सवपूर्वी प्रथेप्रमाणे आयोजित समन्वय बैठकीत राजकीय नेत्यांच्या मानपमानाचे नाट्य पाहायला मिळाले. शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा अगोदर सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर उपस्थित असलेले शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट चिडले. हे प्रोटोकॉल नुसार चुकीचे असल्याचे म्हणत खुर्चीवरून उठत कार्यक्रम सोडून शिरसाट निघाले होते.दरम्यान बाजूलाच बसलेल्या एम.आय.एम. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील त्यांचा हात धरून रोखले व त्या नंतर शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्तालायच्या वतीने आयोजित कार्यक्रमात झालेल्या नेत्यांच्या रुसवे फुगव्याची मात्र जोरदार चर्चा शहरात सुरु आहे.
शहरात एक हजाराच्या जवळपास गणेश मंडळ आहेत. गणेशोत्सव दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. त्यासह गणेश मंडळांना परवानगी घेताना कुठलीही अडचण येऊ नये तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभाग गणेश मंडळाना सुचणा देण्यासाठी दरवर्षी बैठक घेण्यात येते.या बैठकीत शहरातील सर्व ताजकीय पक्षतील नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी आमंत्रित केले जाते.
संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित या बैठकीत सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात येत होते. सध्याचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नंतर शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे स्वागतासाठी नाव पुकारण्यात आले. खैरेंचे नाव ऐकताच आमदार संजय शिरसाट संतापले खुर्चीवरून उठून त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रोटोकॉल नुसार माझा सत्कार खैरे यांच्या अगोदर करायला हवा असे म्हणत ते मंच सोडून जात होते. मात्र, त्याचवेळी त्यांच्या बाजूला बसलेले खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांची समजूत काढत त्यांचा हात धरत खाली बसविले. पोलीस आयुक्तालयाने प्रोटोकॉल पाळला नसल्याबाबत उघड नाराजी व्यक्त करताच, खासदार जलील यांनी त्यांचा हात धरला. त्यांची समजुत काढून शांत केले.
खैरेंच्या स्वागतानंतर लगेच शिरसाट यांचे स्वागत करण्यात आले. शिरसाट हे शिंदे गटात गेल्यानंतर खैरे आणि त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले होते.मात्र ते राजकीय वाद आतां जाहीर मंचावर पाहायला मिळाल्याने या घटनेची जोरदार चर्चा शहरात सुरु आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






