असं काय घडलं? ज्यामुळे ट्विन टॉवर जमीनदोस्त करावा लागतोय; जाणून घ्या 5 मुद्द्यातून!
आज नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर पाडण्यात आले आहे. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले होते. हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत होती. ही टीम दररोज सुमारे 12 तास स्फोटकं लावण्याचं काम करत होती. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे दोन टॉवर जमीनदोस्त झाले आहेत. जमीनदोस्त होणारी देशातील ही पहिली उंच इमारत आहे.इमारत पाडण्यापूर्वी आजूबाजूच्या सोसायटीतील सुमारे 5 हजार लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले.
बांधकाम पाडण्यासाठी 3500 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. यासंदर्भात सुरक्षा व्यवस्थाही मजबूत करण्यात आली आहे. जवळपासचे निवासी भाग रिकामे करण्यात आले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस, सुरक्षा कर्मचारी, बचाव पथक, अग्निपथक तैनात करण्यात आले आहे.एमराल्ड कोर्ट आणि एटीएस व्हिलेज सोसायटीमध्ये राहणाऱ्या सुमारे 5 हजार लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे. नोएडा प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, इमारत पाडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात धुळीचा सामना करण्यासाठी 100 पाण्याचे टँकर तैनात करण्यात आले आहेत. 15 अँटी स्मॉग गन, 6 मेकॅनिकल स्वीपिंग मशीन, सुमारे 200 सफाई कामगार आणि 20 ट्रॅक्टर ट्रॉली लावण्यात आल्या आहेत. याशिवाय 100 हून अधिक अग्निशमन बंबही सज्ज ठेवण्यात आले आहेत.
ट्विन टॉवर पाडण्यामागचं कारण काय?
- 2002मध्ये नोएडा अथॉरिटी सोसायटी बनवण्याची परवानगी दिली होती. त्यात 14 टॉवर, एक शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवण्याची परवानगी देण्यात आली होती.
- त्यानंतर सेक्टर 93Aमध्ये सुपरटेकला भूखंड देण्यात आला होता. जून 2006मध्ये अतिरिक्त भूखंड देण्यात आला होता. तसेच हौसिंग सोसायटीत बदल करण्याचीही परवानगी देण्यात आली होती.
- मात्र, मूळ योजनेत बदल केल्यावर खरेदीदारांची सहमती घेण्यात आली नाही. या योजनेत आपल्या ग्राहकांना ग्रीन एरिया दाखवण्यात आला. 2009मध्ये बेकायदेशीरपणे ट्विन टॉवर बनवण्याचं काम सुरू झालं. त्यानंतर कंपनीने दिशाभूल करत ग्रीन एरियावर दोन टॉवर उभे केले.
- कंपनीच्या या बांधकामाला रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनने विरोध केला. 2010 मध्ये RWA ने ट्विन टावर विरोधात कोर्टात धाव घेतली. मानकानुसार दोन्ही टॉवरच्या दरम्यान 16 फुटाचं अंतर असलं पाहिजे होतं. मात्र, ही मानके धाब्यावर बसून टॉवरमध्ये केवळ 9 मीटरचं अंतर ठेवलं गेलं. या प्रकरणाची पूर्ण सुनावणी झाल्यानंतर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2021मध्ये टॉवर पाडण्याचे आदेश दिले.
दोन्ही टॉवरची ऊंची किती?
- एपेक्स टॉवर 102 मीटर
- सियेन टॉवर 95 मीटर
- कुतुबमीनार 73 मीटर
- इंडिया गेट 42 मीटर
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






