झुंजार । प्रतिनिधी पारोळा – तालुक्यातील लोणी बु ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंच पदाची निवड २४ आॕगस्ट रोजी पार पडली. यात सरपंचपदी सादु सुभाष केदार तर उपसरपंचपदी शशिकांत राघो शिंदे यांची एकमताने निवड झाली. या निवडीबद्दल नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचासह सदस्यांचा आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती, जळगांव जिल्हा बँकेचे संचालक तथा जळगांव जिल्हा दुध संघाचे प्रशासक मा.अमोलदादा पाटील, एरंडोल युवासेना तालुकाप्रमुख बबलु पाटील, मंगरूळ सरपंच मुन्ना पाटील, मिनाबाई मनोहर पाटील, वंदनाबाई वसंत केदार, पॕनलप्रमुख गंगाराम दयाराम पाटील, बंटी पाटील, नाना राजाराम पाटील, विजय शानु केदार, दिलीप ताराचंद पाटील,
प्रभाकर बन्सी पाटील, वासुदेव गुलाब पाटील, समाधान धुडकु पाटील, संतोष अवचित पाटील, मनोहर बापु केदार, दिगंबर शानु केदार, समाधान लिंगायत, धनंजय मनोहर पाटील, महादु बन्सी पाटील, नाना महादु पाटील, शिवाजी हरचंद केदार, कलाबाई भोमा केदार, शिलाबाई संजय केदार, उषाबाई कदम, शिवाजी हरचंद केदार, धर्मा मिस्तरी, भैय्या केदार, जन्याबाई मोरे, गोकुळ मार्चे, विजय अंबोरे, ईश्वर केदार यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






