मुक्ताईनगर :- सध्या महाराष्ट्रात घातपात ( खुनाच्या ) झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच असून आज पुन्हा मुक्ताईनगर तालुक्यात एका महिलेचे अतिशय क्रूर हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, या घटनेने परिसर हादरला आहे. याबाबत पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुक्ताईनगर तालुक्याच्या ठिकाणी मुक्ताईनगर – बुरहानपूर मार्गावर असलेल्या साखर कारखान्याच्या पुढे एका अज्ञात महिलेचा मृतदेह प्लास्टिक कॅरिबॅग मध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गवर संत मुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूस आज सकाळी सदर महिलाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली. धक्कदायक म्हणजे तिची अतिशय क्रूरपणे हत्या केल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह हा जाड प्लॅस्टीकच्या कॅरीबॅगमध्ये भरून तिथे टाकल्याचे आढळून आले. संबंधीत महिलेची ओळख पटली नसून तिचे वय साधारणपणे ४० ते ४५ वर्षाच्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
आज सकाळीच महिलेची निर्घृण हत्या केल्यानंतर अज्ञात महिलेचा मृतदेह प्लॅस्टीक मध्ये कॅरिबॅग मधे आढळून आल्याने मुक्ताईनगर तालुक्यात या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चेला उधान आले आहे.
दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाच्या खालील बाजूस असलेला मृतदेह हा वर काढण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणी पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिसरात हे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच एकच खळबळ उडाली. अनेक ग्रामस्थांनी पुलाकडे धाव घेतली आहे. तर मृतदेह काढण्याचे काम शेवटचे वृत्त हाती आले तोवर सुरूच होते.
हे वाचलंत का ?
- 26 वर्षीय महिला शिक्षिकेने लग्नास नकार दिल्याने, हताश झालेल्या 30 वर्षीय युवकाने शाळेच्या आवारातच महिला शिक्षिकेची केली हत्या!
- दुर्दैवी घटना! पोलीस सर्व्हिसचे प्रशिक्षण पूर्ण करुन पहिल्याच पोस्टिंगसाठी जाताना गाडीचे टायर फुटल्याने IPS अधिकाऱ्याच्या मृत्यू.
- सावदा येथे सराफ दुकानास आग; आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज.
- हजारो भाविकांच्या उपस्थितीत नथ्थू बापुंना चढवली भगवी चादर; पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम.
- धक्कादायक! गेल्या चार वर्षांपासून पोलीस चौकीत हवालदार म्हणून तैनात, सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह, वसुली सुरू, अन् एके दिवशी असा झाला पर्दाफाश.