- नाशकात दारू पिऊन बसमध्ये बसली महिला; तर्राट होऊन धिंगाणा, पोलिसांनाही आवरेना, शेवटी..
- या महिलेनं गाडीतील वाहक आणि प्रवाशांना शिव्या देत बराच धिंगाणा घातला. यानंतर चालकाने बस थेट घोटी पोलीस ठाण्यात नेली.
नाशिक :- दारू पिऊन एका महिलेने बस मध्ये चांगलाच गोंधळ घातल्याने प्रवाशांसह एसटी चालक व वाहकांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते बऱ्याचदा समजावून सुद्धा सदर महिला शांतता ठेवण्यासाठी तयार नव्हती… सदर महिला गोंधळ घालतचं राहिल्याने अखेर वाहकाने बस थेट पोलीस स्टेशन मध्ये नेली, पुढे काय झालं सविस्तर वाचा…
नाशिक घोटी मार्गावर काल सायंकाळी धावणाऱ्या बसेसमध्ये एका महिलेने दारू पिऊन चांगलाच गोंधळ घातला. अचानक या महिलेने गोंधळ घातल्याने प्रवाशांसह एसटी चालक व वाहकांमध्ये मोठा गोंधळ उडाला.अनेक प्रवाशांनी गोंधळ घालणाऱ्या महिलेला समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र महिलेने कोणाचीही एक ऐकले नाही आणि गोंधळ घालनं सुरूच ठेवला. ह्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने एसटी वाहकाने बस पोलिस ठाण्यात नेत महिलेविरुद्ध तक्रार दिली.

पोलिसात गुन्हा दाखल…
बस पोलीस ठाण्यात पोहचवल्यावर देखील सदर दारू पिलेली महिला पोहोचत या महिलेने पोलिस स्टेशनमध्ये देखील गोंधळ घातला. अखेर सदर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. दारू पिलेल्या सदर महिलेने पोलिस कर्मचाऱ्यांना देखील अरेरावी केल्याचेही समोर आले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत घोटी पोलिस ठाण्यात सदर महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदरची महिला बसमध्ये कुठून बसली तिच्यासोबत प्रवासी कोण होते याबाबतचे पोलिस अधिकाऱ्यांसह एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून देखील चौकशी करण्यात आली.
पहा व्हिडिओ :
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील घोटी बस स्थानकातून शेणीत पेहिरीकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये दारू पिऊन एक महिला एसटी बसमध्ये चढली, त्यानंतर महिलेनं बसमध्ये गोंधळ घालत प्रवाशांना, वाहकाला आणि चालकाला शिवीगाळ करायला सुरुवात केली, त्यामुळं संतापलेल्या चालकानं एसटी बस थेट घोटी पोलीस ठाण्यात नेली, पोलिसांनी दारू पिलेल्या महिलेला या घटनेबाबत जाब विचारला असता तिनं पोलिसांनाही उडवाउडवीची उत्तरं देत अरेरावी केली आहे. त्यामुळं पोलिसांचाही गोंधळ उडाला.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, दारू पिलेली महिला ही आदिवासी समाजातील मुलांबाबत बोलत आहे, याशिवाय ती बसमधील चालक आणि वाहकालाही शिवीगाळ करताना दिसत आहे, पोलिसांनी तिला याबाबत जाब विचारला असता तिनं कुणालाही मारहाण केलं नसल्याचं सांगितलं. परंतु पोलिसांनी महिलेची चौकशी केल्यानंतर तिनं फुल्ल दारू पिलेली असल्यानं ती शुद्धीवर नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल…
दरम्यान बसमध्ये गोंधळ घालणाऱ्या या महिलेच्या व्हिडिओ दिवसभर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला झाला आहे. सोशल मीडियावर शेअर देखील केले जात आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






