मध्यप्रदेशच्या सीमेवर भीषण अपघात:वैजापूरचे 3 तरुण ठार, 6 जण जखमी; कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी जात असताना दुर्घटना

Spread the love

चोपडा :- सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मध्यप्रदेशच्या हद्दीत जामटी गावाजवळ मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात वैजापूरच्या चोपडा तालुक्यातील 3 तरुण ठार झाले, तर 6 जण जखमी झाले. पंकज प्रकाश बारेला (वय 17) जगदीश केरसिंग बारेला (वय 19), नीलेश शांतीलाल बारेला (22) अशी मृतांची नावे आहेत.

जखमी आणि मृत तरुणांना चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हे तरुण कबड्डी स्पर्धा बघण्यासाठी मध्यप्रदेशात जात होते. त्याचदरम्यान त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.

अपघाताबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशाच्या हद्दीत जामटी येथील वारला तालुक्यात आज पहाटे हा अपघात झाला. वैजापूर येथील 11 तरुण मध्य प्रदेशात कबड्डीच्या स्पर्धा बघण्यासाठी पिक वाहनाने जात होते. मात्र, मध्यप्रदेशच्या सीमेवर त्यांचे वाहन असतानाच अपघात झाला. अपघात नेमका कसा झाला, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. रस्त्यावरच पिकअप गाडी पलटी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे घटनास्थळावर 3 तरुण जागीच ठार झालेत. तर 6 जखमी झाले. यातील दोन जण गंभीर जखमी आहेत.

वाहनांचा अपघातात झालेला चुराडा

जखमींना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. जखमींची नावे अद्याप कळू शकली नाही. दरम्यान, अपघातामुळे पिकअप वाहनाचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. या घटनेमुळे वैजापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार