जीपीएस कॅम्पस मध्ये क्रीडा दिनाचा उत्साह

Spread the love

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा दिवस क्रीडा दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो.


धरणगाव :- भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी येथे 29 ऑगस्ट 2022 रोजी क्रीडा दिनाचा उत्साह दिसून आला. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून क्रीडा शिक्षक श्री.राकेश धनगर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा दिनाविषयी माहिती सांगितली.


क्रमित अभ्यासक्रमात मेजर ध्यानचंद विषयी असणाऱ्या पाठाविषयी तसेच क्रीडा दिनाविषयी हुसना पटेल मॅम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता पाचवीचा विद्यार्थी दर्शन यादव यानेही क्रीडा दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.


अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात लोकप्रिय झालेल्या जीपीएसच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही आपला ठसा उमटवलेला असून यावर्षी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये जीपीएस कॅम्पस मधील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. जिल्हास्तरीय स्पर्धेमधून जीपीएस कॅम्पसच्या एका विद्यार्थिनीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड देखील झाली होती.

ज्याप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात जीपीएस ने नावलौकिक प्राप्त केलाय त्याचप्रमाणे क्रीडा शिक्षक श्री राकेश धनगर यांच्या मार्गदर्शनात इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या साथीने जीपीएसचा क्रीडाध्वज हा यशस्वीरित्या मार्गक्रमण करीत आहे.
सदर क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाला युवकांना नेहमीच क्रीडेसाठी प्रोत्साहित करणारे माननीय श्री प्रतापरावजी गुलाबरावजी पाटील सर, क्रीडा शिक्षक श्री राकेश धनगर सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार