जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
- कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. दिवस हसत-खेळत घालवाल. खर्च करू की नको असा संभ्रम निर्माण होईल. कार्यक्षेत्रात जबाबदार्या वाढतील. हातातील काम नेमकेपणाने कराल.
वृषभ :-
- अडकलेल्या व्यवहाराला गती मिळेल. घरातील कामे पूर्ण कराल. मनातील ध्यास पूर्ण होईल. राजकीय स्पर्धक पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. आजचा दिवस मनासारखा जाईल.
मिथुन :-
- चंचलतेला आवर घाला. लोकांच्या वागण्याचा अचंबा वाटेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनात उगाचच शंका निर्माण होतील. प्रेमातील व्यक्तीने नातेसंबंध दृढ होतील.
कर्क :-
- तुमची बौद्धिक तपासणी केली जाऊ शकते. जोडीदाराच्या स्वभावात शांतपणा जाणवेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. कामातील बदल योग्य वेळी लक्षात घ्या. मनातील आकांक्षेपुढे बाकी गोष्टी गौण वाटतील.
सिंह :-
- आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. मित्रांशी सलोख्याच्या गप्पा होतील. भाग्याची भक्कम साथ मिळेल. भौतिक सुखात वाढ होईल.
कन्या :-
- मोठी खरेदी केली जाऊ शकते. अभ्यासात कमी पडू नका. आपले विचार अधिक स्पष्टपणे मांडाल. सहकारी कामात मदत करतील. मित्र परिवारात वाढ होईल.
तूळ :-
- जोडीदाराचा स्वभाव ओळखून उत्तर द्या. काही बाबी स्वीकाराव्या लागतील. महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी. जुगारातून धनलाभ संभवतो. अधिकार्यांचे मार्गदर्शन घेऊनच कामे करा.
वृश्चिक :-
- शैक्षणिक गोष्टी मार्गी लागतील. सरकारी कामे पुढे सरकतील. भावंडांशी नाते दृढ होईल. कर्तुत्वाला चांगला वाव आहे. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.
धनू :-
- तुमच्यातील कलागुणांचे कौतुक केले जाईल. जवळचे नातेवाईक भेटतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. बोलण्यातून गैरसमज पसरवू नका. व्यवसाय विस्ताराच्या योजना आखाल.
मकर :-
- तुमच्यातील न्यायीपणा उपयोगी पडेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. भागीदारीत सावधानता बाळगावी. कौटुंबिक वाता
कुंभ :-
- तुमच्यातील सद्गुणांची वाढ होईल. तडकाफडकी कामे करू नका. सारासार विचार करण्यावर भर द्या. घरातील वातावरणात दिवस मजेत जाईल. सरकारी योजनांचा लाभ घ्यावा.
मीन :-
- घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. उतावीळपणे खर्च करू नका. एखादी गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. भावनेला आवर घालावी लागेल. प्रेमात वाहून जाऊ नका.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






