सध्या सगळीकडे गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. मंगळवारी देशभरात बाप्पांचे उत्साहात आगमन झाले. प्रत्येकाने बाप्प्यांचे जल्लोषात स्वागत केले. पण असं म्हणतात कधी कधी अति उत्साह बरा नसतो. हो, उत्साहाच्या भरात आपण अनेकदा मोठ्या चुका करतो. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सदर व्हिडिओ हा एका स्टंटचा आहे. गणपती आगमणाच्या वेळी तरुणाने केलेला स्टंट त्याला चांगलाच महागात पडला.
पहा व्हिडिओ :
सध्या देशभरात बाप्पांचे उत्साहात आगमन करण्यात आले. गणपती आगमनाच्यावेळी अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. सूरतच्या पर्वत पाटिया परिसरात अशाच एका कार्यक्रमात स्टंटबाजी करताना एक थरारक घटना घडली.
तरुण फायर स्टंट करताना त्याच्या चक्क शरीराला आग लागली. आजूबाजूचे लोक त्याला वाचवायला धावले पण त्याने वेळीच आपले शर्ट काढले आणि स्वत:ची सुटका केली. या संपुर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






