शिक्षण विभाग पंचायत समिती धरणगाव व जीपीएस कॅम्पस पाळधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 49 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात रमले बालवैज्ञानिक

Spread the love

धरणगाव / प्रतिनिधी.

पाळधी ( ता धरणगाव ) :- दिनांक 2 सप्टेंबर 2022 रोजी शिक्षण विभाग पंचायत समिती धरणगाव व भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील स्कूल कॅम्पस पाळधी यांच्या संयुक्त विद्यमाने 49 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पाळधी च्या जीपीएस कॅम्पस येथे आयोजित करण्यात आले होते. सदर विद्या प्रदर्शनात 123 शाळांनी सहभाग नोंदवून, विद्यार्थ्यांनी आपल्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण केले.

विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले सदर उद्घाटन समारंभास माननीय डॉक्टर श्री नितीन बच्छाव साहेब माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, माननीय डॉक्टर श्री अनिल झोपे सर प्राचार्य डायट, माननीय श्री विकास पाटील सर प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव, माननीय श्री सुशांत पाटील सर गटविकास अधिकारी उच्च श्रेणी पंचायत समिती धरणगाव, जीपीस चे कार्यकारी संचालक श्री प्रतापरावजी गुलाबरावजी पाटील, श्री मुकुंजी नन्नवरे, श्री. संजयजी महाजन, श्री गोपाल सोनवणे, माननीय श्री रविकिरण बिऱ्हाडे साहेब गट शिक्षणाधिकारी प. स.धरणगाव, माननीय श्री प्रमोद सोनवणे सर केंद्रप्रमुख पाळधी, भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री डी.डी. कंखरे सर,श्री योगेश करंदीकर सर व श्री सचिन पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते.
विज्ञान व तंत्रज्ञान हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे व विज्ञानाची कास आपण सर्वांनी धरावी,जय जवान, जय किसान, जय विज्ञान असे प्रतिपादन माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांनी आपल्या भाषणातून केले, माननीय श्री नितीन बच्छाव सर माध्यमिक शिक्षणाधिकारी जळगाव यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री रविकिरण बिऱ्हाडे सर गटशिक्षणाधिकारी धरणगाव जि. प. शाळा निंभोरा येथील शाळेचा नवोदय मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल मुख्याध्यापकांसह सत्कार करण्यात आला.


सदर कार्यक्रमाला संपूर्ण तालुक्याभरातून विविध शाळांनी प्रतिसाद देत शिक्षक बंधू-भगिनींनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली.
सदर विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षणाचे कार्य माननीय श्री डी ए धनगर सर, माननीय श्री संजय कृष्णा पाटील सर, माननीय श्री आर सी कोळी सर, माननीय श्री वंजारी सर यांनी केले.

विज्ञान प्रदर्शनाचा निकाल खालील प्रमाणे

उच्च प्राथमिक गट ( इयत्ता सहावी ते आठवी )
प्रथम क्रमांक

अयान अलाउद्दीन खाटीक
( गुड शेफर्ड स्कूल, धरणगाव, बायोक्लॉक उपकरण )

द्वितीय क्रमांक
अंकिता ज्ञानेश्वर बोरसे
जि प उच्च प्राथमिक शाळा निंभोरा
स्मार्ट हेल्मेट उपकरण

तृतीय क्रमांक
राज गुलाब पाटील
माध्यमिक विद्यालय भोणे
गणितीय खेळणे

उत्तेजनार्थ
रेहान खान, नितीन नाथ
भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी
3D होलोग्रम

उत्तेजनार्थ
प्राजक्ता हिम्मतसिंग पाटील
इम्पेरियल स्कूल पाळधी
हाय फाय मॉडेल

माध्यमिक व उच्च माध्यमिक गट( इयत्ता नववी ते बारावी )
प्रथम क्रमांक

धीरज अनिल पाटील
भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालय पाळधी
स्वयंचलित पथदिवे


द्वितीय क्रमांक

यशोदीप मधुकर पालीवाल
सा.दा.कुडे माध्यमिक विद्यालय धरणगाव
स्मार्ट वेहिकल

तृतीय क्रमांक
नीरल नितीन चव्हाण
पी आर हायस्कूल धरणगाव
भूकंप निर्देशक

उत्तेजनार्थ
पवन राजू पाटील
मा.ना. काबरे विद्यालय सोनवत
सुलभ व सुरक्षित प्रवास

उत्तेजनार्थ
चेतना पुरुषोत्तम कोतकर
इंदिरा गांधी विद्यालय
3 आर मंत्राज

प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य
प्रथम क्रमांक

सौ योगिता पंकज लोखंडे
जि प शाळा धानोरे
बहुउपयोगी शैक्षणिक साहित्य

द्वितीय क्रमांक
शेख नबी शेख गणी
जि प उर्दू शाळा एक धरणगाव
मॅजिक गणित

तृतीय क्रमांक
सौ वर्षा प्रदीप साळुंखे
जि प शाळा वंजारी
खेडकर गणित

उत्तेजनार्थ
सौ वैशाली रमेश जाधव
जि प कन्या शाळा पाळधी
पर्यावरण

माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य
प्रथम

सौ भारती प्रल्हाद पाटील
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय धरणगाव
सिम्बॉल ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट

प्रयोगशाळा सहाय्यक गट
प्रथम

धनंजय प्रकाश शेवाळे
सर्वज्ञ माध्यमिक विद्यालय बोरगाव
गणितीय संकल्पना

द्वितीय
ज्ञानेश्वर हरचंद गायकवाड
पी आर हायस्कूल धरणगाव
व्यसनमुक्ती यांनी पटकावला

सदर 49 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वीतेसाठी जीपीएस कॅम्पस मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी, सर्व केंद्रप्रमुख धरणगाव शिक्षण विभाग, गटसाधन केंद्र धरणगाव सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना, धरणगाव तालुका विज्ञान अध्यापक मंडळ व धरणगाव तालुक्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योती राणे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री नाना पाटील सर यांनी केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार