झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल- धर्माच्या भिंती दूर करून शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ.के.ए.बोहरी यांचेकडे सुमारे चौतीस वर्षांपासून गणपतीची स्थापना केली जात आहे.राष्ट्रीय एकात्मतेचे आणि सर्वधर्म समभावाचे अत्यंत ज्वलंत उदाहरण म्हणून डॉ बोहरी यांचेकडील गणपती उत्सवाकडे पाहिले जाते.शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ.के.ए.बोहरी यांचेकडे त्यांचे पुत्र डॉ.फरहाज बोहरी यांनी लहानपणी सुमारे चौतीस वर्षांपूर्वी श्री गणपतीची स्थापना केली होती.त्यानंतर सलग चौतीस वर्षांपासून डॉ.बोहरी यांच्या रुग्णालयात दरवर्षी नियमितपणे गणपतीची पूर्ण धार्मिक पद्धतीने स्थापना करण्यात येत आहे.
रुग्णालयात दररोज सकाळ व सायंकाळी गणपतीची आरती म्हटली जाते.तसेच अनंत चतुर्थीच्या दिवशी विधिवत पुजा करून विसर्जन केले जाते.यावर्षी डॉ.के.ए.बोहरी,डॉ.जिवन पाठक,निवृत्त शिक्षक नामदेव चौधरी,ज्येष्ठ पत्रकार प्रा.शिवाजीराव अहिरराव, डॉ.फरहाज बोहरी,राजेंद्र चौधरी,समाधान बडगुजर,हेमंत कुलकर्णी,जाकीर शेख यांचेसह रुग्णालयातील कर्मचा-यांच्या उपस्थितीत गणपतीची स्थापना करण्यात आली.यावेळी माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव,डॉ.श्रीमती एन.के.बोहरी,डॉ.अंबरीन बोहरी यांचेसह बोहरी परिवारातील सदस्य उपस्थित होते.
डॉ.के.ए.बोहरी यांच्या परिवारातील सर्व सदस्य डॉक्टर्स,व्यावसायिक असून दरवर्षी गणेशोत्सवासह अन्य उत्सवांमध्ये सक्रीय सहभागी होत असतात.गणपतीची स्थापना केल्यामुळे दहा दिवस परिवारातील सर्व सदस्य गणेशोत्सवाचा आनंद लुटत असल्याचे डॉ.बोहरी यांनी सांगितले.डॉ.बोहरी यांच्याकडे साजरा होणारा गणेशोत्सव म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्म समभाव याचे सुंदर उदाहरण असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






