पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्या-खा. उन्मेशदादा पाटील

Spread the love

एरंडोलला पद्मालय गॅस एजन्सीमध्ये इंडीयन ऑईलचा 63 वा वर्धापन दिन साजरा
एरंडोल – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जळगांव लोकसभा मतदार संघाचे खा. उन्मेशदादा पाटील यांनी एरंडोल येथे केले.
एरंडोल येथील पद्मालय गॅस एजन्सीमधील इंडियन ऑईलच्या 63 व्या वर्धापन दिननिमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खा. पाटील बोलत होते. यावेळी त्यांचे हस्ते स्मार्ट सिलेंडर, कंपोझिट सिलेंडरचे बीपीएल कार्डधारक महिलांना वाटप करण्यात आले.

महिलांचे आरोग्य सांभाळले जाणार असून वापरण्यासाठी सोपे, कमी वजनाचे, कोणतेही धोका नसलेले संपूर्ण गॅस (सिलेंडर, शेगडी, रेग्यूलेटर) मोफत वाटप करण्यात आले. यावेळी इंडियन ऑईलचे विभागीय अधिकारी कुमारसाहेब यांचेसह प्रांताधिकारी विनय गोसावी, तहलिदार सुचिता चव्हाण, पद्मालय गॅस एजन्सीचे संचालक अशोक सुपडू पाटील, भाजपाचे भिकाभाऊ कोळी, निलेश परदेशी, पिंटू राजपुत, ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजीराव अहिरराव, भडगांव गॅस एजन्सी संचालक श्रावण लिंडायत, संकल्प इण्डेन कासोदा संचालक अतुल नांदेडकर, शिरीष इंण्डेन जळगांवचे साहेल साळूंखे, अर्जून लोहार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

खा. उन्मेशदादा पाटील यांनी उज्वला-2 यासह इतर योजनांचा गरीब, सामान्य जनतेसाठी लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, पुरवठा खाते यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उज्ज्वल भारत भविष्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असल्याचे सांगून त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सर्वांनी झटण्याचे आवाहन करून जळगांव लोकसभा मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक योजना असून त्यासाठी मी परिश्रमपुर्वक काम करीत असल्याचेही यावेळी सांगितले. पद्मालय गॅस एजन्सीची ग्राहक सेवा आणि कारभार याबाबत खासदार उन्मेषदादा आणि इंडियन ऑइल कंपनीचे विभागीय अधिकारी कुमारसाहेब यांनी समाधान वक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन पत्रकार किशोर मोराणकर यांनी केले तर आभारप्रदर्शन पराग पाटील यांनी केले. कार्यक़्रमासाठी पत्रकार जावेद मुजावर, अ‍ॅड. मधुकर देशमुख, चेतन पाटील, यांचेसह नागरीक, महिला, भाजपा कार्यक़र्ते उपस्थित होते. यशस्वीतेसाठी पद्मालय गॅस एजन्सीचे कर्मचारी भरत पाटील आदींनी परिश्रम घेतले.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार