तिरूवअनंतपूरम : मानव क्रूर आहे पण प्राणी पक्षांच्या बाबतीत किती क्रूर असू शकतो याची प्रचिती या व्हिडिओतून येते. सध्या सोशल मीडियात हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका झाडाला पाडल्यामुळे अनेक पक्षांचा मृत्यू झाला आहे. हा हृदयद्रावक व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडिओ केरळमधील असल्याचं समोर आलं आहे. केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी झाडे तोडण्यात येत असून यामुळे अनेक पक्षांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुःखद घटनेचा व्हिडिओ भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी परवीन कासवान यांनी ट्वीट केला आहे….
या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर टीकेची झोड उठवली आहे. केरळ सराकारवर सध्या निशाणा केला जात आहे. हा व्हिडिओ सध्या अनेकांनी शेअर केला आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






