आजचे राशीभविष्य, ( सोमवार ५ सप्टेंबर २०२२ )

Spread the love

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष :-

  • खर्चावर नियंत्रण ठेवावे. घरातील वातावरण आनंदी राहील. आततायीपणा करू नये. प्रयत्नांची कास सोडू नये. मनावर कोणताही ताण घेऊ नये.

वृषभ :-

  • कामात चांगली प्रगती करता येईल. व्यावसायिक ठिकाणी काही लक्षात ठेवण्याजोगे अनुभव येतील. ग्रहांचा चांगला पाठिंबा मिळेल. मेहनतीला मागे हटु नका. आखलेल्या योजनांवर भर द्या.

मिथुन :-

  • मित्रांचा विचित्र अनुभव येऊ शकतो. कौटुंबिक चर्चेत आक्रमक होऊ नका. कौटुंबिक स्थिती संयमाने हाताळा. हित शत्रूंवर लक्ष ठेवा. आर्थिक स्थिती उत्तम राहील.

कर्क :-

  • भागीदारीचा निर्णय विचारपूर्वक करा. अंगीभूत कलागुणांना वाव मिळेल. नवीन ओळखी वाढतील. प्रेमाला उत्तम साथ मिळेल. ओळखीचे मैत्रीत रूपांतर होईल.

सिंह :-

  • जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कामातील समस्या सोडवता येतील. मनात अनामिक भीती दाटून येईल. अतिश्रमामुळे थकवा जाणवेल.

कन्या :-

  • घरात आनंदी वातावरण राहील. व्यवसाय पुन्हा मूळ पदावर येईल. आर्थिक गणिते सुधारतील. योजनेला मूर्त रूप द्याल. विरोधकांकडे लक्ष ठेवा.

तूळ :-

  • घरातील मोठ्यांचा आशीर्वाद पाठीशी ठेवा. कामात असताना इतरत्र लक्ष देऊ नका. एखादी घटना मन खिन्न करू शकते. विरोधक नरमाईने घेतील. हातातील काम पूर्ण होईल.

वृश्चिक :-

  • लहान प्रवास घडेल. किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. पराक्रमात वाढ होईल. दिनक्रम व्यस्त राहील. भेटवस्तू मिळण्याची शक्यता.

धनू :-

  • जोडीदाराशी सुसंवाद घडेल. कौटुंबिक गैरसमज टाळा. शिक्षण, स्पर्धेत यश मिळेल. बचतीच्या योजना आखाव्यात. मुलांचा उत्साह वाढीस लागेल.

मकर :-

  • व्यावसायिक संधी लक्षात घ्याव्यात. व्यायामाचा आळस करू नका. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. मित्रांची भेट मन प्रसन्न करेल. निष्काळजीपणा करू नका.

कुंभ :-

  • चांगले मनोरंजन घडेल. कोर्टाची कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीतील प्रयत्न यश देतील. चुगलखोर व्यक्तींकडे दुर्लक्ष करावे. कामाची दिवसभर धावपळ राहील.

मीन :-

  • कामातील उत्साह व धडाडी वाढेल. जुने मित्र भेटतील. वाहन चालवताना काळजी घ्या. बोलण्यात सौम्यता बाळगा. खर्चाला आवर घाला.

हेही वाचलंत का ?

टीम झुंजार