झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल-पळासदड (ता.एरंडोल) येथील शास्त्री इंन्सीटयूट ऑफ फार्मसी महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक देखरेख समितीने मागील वर्षासाठी अतिउत्तम दर्जा दिला आहे.महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या देखरेख समितीच्या पथकाने शास्त्री महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा,दैनंदिन शिक्षण व्यवस्था,परीक्षा पद्धती,शिक्षक,विद्यार्थी व शिक्षकांसाठी महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम याची पाहणी केली होती.
पथकातील सदस्यांनी महाविद्यालयातील सोयी व सुविधांबद्दल समाधान व्यक्त करून अतिउत्तन दर्जा महाविद्यालयास प्रदान केल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.शास्त्री महाविद्यालयाची चार वर्षांपूवी स्थापना झाली असून अल्पकाळात महाविद्यालयाने वेगाने प्रगती केली आहे.शास्त्री फार्मसी महाविद्यालयाला नवी दिल्ली येथील फार्मसी कॉन्सील ऑफ इंडिया या केंद्रीय संस्थेची तसेच तंत्रशिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांची मान्यता आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसीचे शिक्षण घेता यावे यासठी मोठ्या शहराऐवजी ग्रामीण भागात फार्मसी विद्यालय सुरु केले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय शास्त्री यांनी सांगितले.महाविद्यालयात तज्ञ शिक्षक असून विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.महाविद्यालायाचा परीक्षेचा निकाल देखील समाधानकारक लागत असल्याचे त्यांनी सांगितले.महाविद्यालयाला मिळालेल्या अतिउत्तम दर्जामध्ये सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोठे योगदान असल्याचे संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.विजय शास्त्री,सचिव रूपा शास्त्री यांनी सांगितले.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






