विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेवावा. आ चिमणराव पाटील. एरंडोलला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न.

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी एरंडोल- विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेवून शैक्षणिक प्रगती करावी असे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.अँग्लो उर्दू हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विद्यान प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अँग्लो उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम अध्यक्षस्थानी होते.डाएटचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे,शिक्षणाधिकारी विकास पाटील,ज्येष्ठ अधिव्याखाता सी.डी.साळुंखे यांनी प्रदर्षांस्थाली भेट देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले.

तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्याहस्ते प्रदर्शनातील विजेत्या शाळा आणि विद्यार्थ्याना बक्षिस वाटप करण्यात आले.प्रदर्शनात तालुक्यातील ९५ शाळांनी तर १९७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी शिक्षणामुळे आदर्श समाजाची निर्मिती होत असल्याचे सांगितले.प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील जीवनाचा पाया असून,पाया मजबूत असेल तर अनेक माजली इमारत बांधता येत असल्याचे सांगितले.विद्यान प्रदर्शनात विद्यार्थी आणि शाळा मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

विद्यार्थ्याना शैक्षणिक कार्यासाठी कायम मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागात तालुक्यातून जिल्हा परिषद उर्दू शाळा क्रमांक १ ला प्रथम तर रा.ति.काबरे विद्यालयास द्वितीय तर न्यू इंग्लिश स्कूलला तृतीय क्रमांक मिळाला.माध्यमिक विभागात लिटल स्कूल कासोदा या शाळेस प्रथम तर सम्यक इंग्लिश स्कूलला द्वितीय व रिंगणगाव येथील आर,एन.पाटील विद्यालयास तृतीय क्रमांक मिळाला.

प्राथमिक शिक्षकांमध्ये श्री माळे सर यांनी माध्यमिक शिक्षकांमधून अभिमान पाटील यांनी तर परिचर गटातून अशपाक बागवान यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रदर्शनात ३९ प्राथमिक आणि ९ माध्यमिक शिक्षक सहभागी झाले होते.तसेच प्रातःमिक गटातून ७७ तर माध्यमिक गटातून ५८ विद्यार्थी प्रदर्शनात सहभागी झाले होते.प्रदर्शनात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर उपकरणे सादर केले होते.

आमदार चिमणराव पाटील यांनी प्रदर्शनाची पाहणी करून उपकरणानबाबत माहिती जाणून घेतली.तहसीलदार सुचिता चव्हाण,गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांच्याहस्ते सर्व विजेत्या शाळा आणि विद्यार्थ्याना बक्षिस वाटप करण्यात आले.प्रदर्शनाचे नियोजन गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

उपमुख्याध्यापक शेख सलीम शेख यांनी सुत्रसंचलन केले.शिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी प्रास्ताविक केले.शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.प्रदर्शनासाठी शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र महाजन,जे.डी.पाटील यांचेसह सर्व केंद्र प्रमुख,मुख्याध्यापक,शिक्षक यांनी सहकार्य केले.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार