सोलापूर : – सोलापूरच्या करमाळ्यात एका मालगाडीचा अपघात झाला. मालगाडीचं इंजिन थेट शेतात घुसल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मालगाडीचं नुकसान झालं. मालगाडीचे डबेही रेल्वे रुळावरुन घसरल्याचं पाहायला मिळालंय.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातल्या केम गावाजवळ मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा अपघात झाला होता. मालवाहू गाडीचे रेल्वे इंजिन थेट शेतात घुसल्याचे पाहायला मिळालं. आज सकाळच्या सुमारास केम या गावाजवळील शेतात सिमेंट भरलेल्या रेल्वेचे इंजिन रूळ सोडून थेट शेतात घुसले.
पहा व्हिडिओ :
सुदैवाने शेतात लोकवस्ती किंवा व्यक्ती नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र रेल्वे इंजिन रुळावरून खाली घसरल्याने काही रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. आता ही रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्नही सुरु आहेत.
थोडक्यात मोठा अनर्थ टळला
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुदैवानं ही मालगाडी असल्यानं यात कोणतेही प्रवासी नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होता. मात्र थोडक्यात मोठा अनर्थ टळला आहे. असं असलं तरी आर्थिक नुकसान झालंय. मालवाहू ट्रेनमध्ये सिमेंट असल्याची माहिती मिळतंय.
बचावकार्य सुरु
सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीला हा अपघात झालाय. हा अपघात नेमका कुणाच्या चुकीने झाला, याचाही आता तपास केला जाईल. मात्र सध्या अपघातग्रस्त रेल्वेतील सामान, रेल्वेरुळावरुन घसरलेले डबे आणि इतर यंत्रणा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रेल्वेचे अधिकारी आणि बचाव पथकाकडून पुढील गोष्टी सुरळीत व्हाव्यात, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






