मोहाली ( पंजाब ) : – हा ड्रॉप टॉवर पाळणा अतिशय वेगाने फिरत होता. अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा तोल गेला आणि भरधाव वेगात तो खाली पडला यात्रेतील पाळण्याच्या दुर्घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये काही लोक जखमी झाले आहेत. पंजाबमधील मोहाली येथील ही घटना असल्याचं समोर आलं आहे. या घटनेत मुलांसह अनेकजण जखमी झाले आहेत. हा थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा पंजाबमधील असून एका यात्रेत हा अपघात घडला आहे. एका खांबाच्या भोवती फिरणाऱ्या गोलाच्या पाळण्यात अनेक लोकं बसले होते. हा पाळणा गोल गोल फिरत असताना बऱ्याच उंचीवरून खाली वर होत होता. पण अचानक काही तांत्रिक बिघाडामुळे जवळपास ५० फूटाच्या उंचीवरून पाळणा खाली पडला.
दरम्यान, पाळणा पडल्यानंतर अनेक लोकं पाळण्यातून उडून खाली पडले. सुदैवाने या दुर्घटनेत कुणाचाही मृत्यू झाला नसून अनेक लोकं जखमी झाले आहेत. हा व्हिडिओ अंजली चौधरी या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केला असून हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






