कै.कुशल तिवारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाथ बालकांना भोजन.
झुंजार । प्रतिनिधी एरंडोल-आयुष्यात धन,संपत्ती किती कमावली यापेक्षा सामाजिक,धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे वेगळी ओळख निर्माण होत असते असे प्रतिपादन तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी केले.कै.कुशल तिवारी यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे आजही त्यांची समाजात वेगळी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.कै.कुशलदादा तिवारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त खडके बुद्रुक (ता.एरंडोल) येथील अनाथ मुलांच्या बालगृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी तिवारी परिवाराच्यावतीने अनाथ बालकांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
यावेळी तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी जिवनात पैसा,धन,संपत्ती यामुळे ओळख निर्माण होत नसून सामाजिक कार्यात केलेल्या कार्यामुळे ओळख निर्माण होत असल्याचे सांगितले.कै.कुशल तिवारी यांनी जिवनात सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या निधनामुळे सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे सांगितले.कै.कुशल तिवारी यांनी अनाथ बालकांसाठी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.कै.कुशल तिवारी यांच्या सामाजिक,धार्मिक आणि शैक्षणीक क्षेत्रातील विविध उपक्रमांचा वारसा त्यांच्या परिवारातील सदस्यांनी सुरु ठेवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड यांनी कोरोनाकाळात कै.कुशल तिवारी यांनी गोरगरीब नागरिकांना केलेल्या मदतीची माहिती दिली.अनाथ मुलांचे बालगृह आणि कै.कुशल तिवारी यांचे अत्यंत भावनिक नाते होते असे सांगितले.अनाथ मुलांना मायेची ऊब मिळण्यासाठी तिवारी परिवाराने कायम सहकार्य केल्याचे सांगितले.बालगृहाचे अधिक्षक मधुकर काटे यांनी कै.कुशल तिवारी यांनी अनाथ मुलांसाठी केलेल्या मदतीबद्दल माहिती दिली.

भाऊसाहेब पंडित यांनी आभार मानले.यावेळी राहुल तिवारी यांनी प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण केला.कार्यक्रमास कै.कुशल तिवारी यांचे वडील किरण तिवारी,आई शोभा तिवारी,भाऊ राहुल तिवारी,विशाल तिवारी,श्रीमती दर्शना तिवारी,अर्चना तिवारी,सोनाली तिवारी,प्रथम तिवारी,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,उपनिरीक्षक शरद बागल,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवार,जयेश पांडे,शिवाजी वाल्डे,मिलिंद वाल्डे,कर्णवीर ठाकोर,विजय मराठे,चेतन चौधरी,पत्रकार संजय चौधरी,सकाळचे तालुका बातमीदार आल्हाद जोशी यांचेसह तिवारी परिवारातील सदस्य व कुशलदादा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळी-खडके बुद्रुक (ता.एरंडोल) येथे कै.कुशलदादा तिवारी यांच्या पुण्यातीठीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित तहसीलदार सुचिता चव्हाण,माजी सभापती शालिग्राम गायकवाड,पराग पवार व तिवारी परिवारातील सदस्य.






