जळगाव : – सध्या महाराष्ट्रात महिला लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच आईचे पंधरा दिवसापूर्वीच आजारपणामुळे निधन होते. या दुःखातून सावरत नाही तोच आता तरुणीसोबत धक्कादायक घटना घडली. कौटुंबीक संबंधांचा फायदा घेत आणि चाकूचा धाक दाखवून तरुणीवर अत्याचार झाल्याची भयंकर घटना घडली आहे. या प्रकरणी जळगावमधील शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेला प्रकार कुणाला सांगू नये म्हणून पीडितेचा मोबाइलही आरोपीने फोडल्याचं समोर आलं आहे.
कौटुंबीक संबंध असल्याचा गैरफायदा घेत एक जण जेवणाचा डबा घेण्यासाठी तरुणीच्या घरी आला. यावेळी चाकूचा धाक दाखवून तो तरुणीला त्याच्या घरी घेवून गेला. आणि तिच्यावर अत्याचार केला. जळगाव शहरात मंगळवारी ( Sexual Assault On 22 Year Old Girl ) ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या कृत्याला विरोध केल्याने आरोपीने पीडित २२ वर्षीय तरुणीच्या हातावर चाकूने वार करून तिला जखमी केल्याचेही समोर आले आहे. घटनेने हादरलेल्या पीडित तरुणीने अखेर या प्रकरणी पाच दिवसानंतर शनिपेठ पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रारीनंतर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या विनोद सुकलाल भोळे (रा.सदोबा नगर, जळगाव) याच्याविरुध्द शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणीच्या आईचे पंधरा दिवसापूर्वीच आजारपणामुळे निधन झाले आहे. तर वडील एका ठिकाणी कामाला आहेत. १ सप्टेबरला वडिलांची रात्रपाळीची ड्युटी असल्याने ते कामावर गेले होते. त्यामुळे पीडित तरुणी घरी एकटीच होती. पीडित तरुणीच्या परिवारासोबत विनोद भोळे याचे घरोब्याचे संबंध होते. त्यामुळे त्याचं येणंजाणं होतं. या काळात त्याची पत्नी व दोन मुलं गावाला गेलेले होते. त्यामुळे पीडितेकडून त्याला जेवणाचा डबा मिळत होता.
दिलेल्या अन्नालाही जागला नाही
१ सप्टेबरला रात्री ११ वाजता आरोपी विनोद भोळे हा पीडितेच्या घरी गेला. घरात आल्यावर त्याने चाकूचा धाक दाखवून पीडितेला बाहेर निर्मनुष्यस्थळी घेऊन गेला. तिथे अंधार असल्याने तिथून तो तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला. घरी त्याने पीडितेवर दोन वेळा अत्याचार केला. यावेळी तरुणीने विरोध केला. पण त्याने तिच्या डाव्या हातावर चाकूने वार करून तिला जखमी केलं. एवढेच नव्हे तर पीडितेने हा प्रकार कुणाला सांगू नये म्हणून तिचा मोबाइलही फोडून टाकला. तसेच कुणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर आरोपी फरार आहे. अद्याप त्याला अटक झालेली नाही.
गुन्हा दाखल .
अत्याचार झाल्यानंतर तब्बल एक तासाने आरोपीने पीडित तरुणीची सुटका केली. घटनेने तरुणी हादरली होती. पण मोठं धाडस करत याप्रकरणी पीडित तरुणीने मंगळवारी शनिपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार भोळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश चव्हाण हे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






