जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
- व्यवसायात स्वत:च अस्तित्व निर्माण कराल. शांत पद्धतीने केलेली कामे यश देतील. गरजूंना मदत कराल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. भावंडांशी नाते दृढ होईल..
वृषभ :-
- अनपेक्षित लाभ होतील. तुमच्यावर शंका घेतली जाईल असे वागू नका. कर्ज व्यवहार टाळावेत. व्यवसाय विस्ताराचा विचार कराल. कामात क्षुल्लक समस्या येऊ शकतात.
मिथुन :-
- अचानक लाभाची शक्यता. जुन्या प्रश्नांची उकल होईल. जोडीदार तुमच्यावर खुश होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. हित शत्रूंच्या कारवाया वाढतील.
कर्क :-
- घरात चांगले कार्य घडेल. समोरच्याचे वर्चस्व राहील. वरिष्ठ अधिकार्यांचा पाठिंबा मिळेल. ज्येष्ठ अधिकार्यांची गाठ पडेल. प्रेमसंबंध मानसिक शांतता प्रदान करतील.
सिंह :-
- सर्वांशी सामंजस्याने वागाल. भागीदारीत काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत. आपले स्पर्धक त्रास देऊ शकतात. आत्मविश्वास वाढीस लागेल. झालेल्या लाभाची वाच्छता करू नये.
कन्या :-
- घरातील कामात आनंद मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. जुनी समस्या संपुष्टात येईल. प्रलंबित कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील. दिवसाचा उत्तरार्ध मित्रांसोबत घालवाल.
तूळ :-
- अपेक्षित उत्तराची प्रतीक्षा संपेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. कार्यक्षेत्रात जोखीम पत्करताना सावधानता बाळगा. कर्जाचे व्यवहार टाळावेत. कामावर अधिक लक्ष केंद्रीत करावे.
वृश्चिक :-
- व्यवसायात पुढारीपणा दाखवाल. गोड बोलून कामे करून घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नियोजन व कौशल्य पणाला लागू शकते. कामाच्या ठिकाणी वादात पडू नका.
धनू :-
- घरातील वातावरण आनंददायी असेल. मोठ्या वस्तूंची खरेदी होईल. अधिकारी वर्गाकडून पूर्ण सहयोग मिळेल. पालकांच्या सल्ल्यानेच कामे करावीत. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
मकर :-
- समोरच्यावर एकदम विश्वास ठेऊ नका. विद्यार्थ्यांनी चिकाटी सोडू नये. लाभ पदरात पडून घ्यायला धावपळ होईल. काही सकारात्मक वार्ता मिळतील. मानसिक तणाव निवळतील.
कुंभ :-
- संभ्रमात कोणतेही काम करू नका. एकाच वेळी अनेक कामे सामोरी येतील. जुनी कामे मार्गी लागतील. प्रवास जपून करावा. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्या.
मीन :-
- नवीन अधिकार हातात येतील. खाण्यावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल काळ. कौटुंबिक जबाबदार्या उत्तमरीत्या पार पाडाल. विवाह इच्छुकांना पुढील बोलणीसाठी अनुकूल दिवस.
हेही वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






