जळगाव : – सध्या महाराष्ट्रात आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे अश्यातच. पत्नी माहेरी गेल्यानंतर घरी एकट्या असलेल्या पतीनं आत्महत्या केल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. २८ वर्षीय युवकाने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेत जीवनयात्रा संपविली. विजय यशवंत अटकाळे (वय-२८) रा. सिंध्दार्थ नगर, रामेश्वर कॉलनी जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय अटकाळे हा पत्नी व मुलासह रामेश्वर कॉलनीतील सिद्धार्थ नगरात वास्तव्याला होता. मजुरी आणि हमाली काम करून तो उदरनिर्वाह करायचा. काही दिवसांपासून त्यांची पत्नी माहेरी गेली होती. त्यामुळे तो घरी एकटाच होता. मंगळवारी रात्री गल्लीतील नातेवाईकांशी गप्पा मारून विजय घरी परतला.
विजय अटकाळे हा पत्नी व मुलासह रामेश्वर कॉलनीतील सिध्दार्थ नगरात वास्तव्यास असून तो मिळेल तशी मजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची पत्नी माहेरी गेलेल्या होत्या. त्यामुळे ते घरी एकटेच होते. मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी रात्री गल्लीतील नातेवाईकांशी गप्पा मारून रात्री घरी गेले.
मध्यरात्री विजयने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे बुधवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीला आला. यासंदर्भात शेजारी राहणाऱ्यांनी एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळीधाव घेवून पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






