गणपती विसर्जन करतांना ‘हे’ नियम लक्षात ठेवा
‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनंती करत अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जातो. पण गणपती बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला का केले जाते यामागची दंतकथा बऱ्याच जणांना माहित नसते.
देशात सर्वत्र जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाने भक्तगण आनंदात आहेत. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन करतात. १० दिवस सर्वत्र उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते. यानंतर गणपती बाप्पा आता थेट पुढच्या वर्षी दर्शन देणार या भावनेने भक्त उदास होतात. पण ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनंती करत अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जातो. यावर्षी अनंत चतुर्दशी ९ सप्टेंबर, शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. मात्र, गणपती बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्दशीलाच का केले जाते हे बऱ्याच जणांना माहित नसेल. यामागचे कारण आणि या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊया.
यावर्षी अनंत चतुर्दशी ९ सप्टेंबर, शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्याच्या चौदाव्या दिवशी अनंत चतुर्दशी येते. या दिवशी १० दिवसांचा गणेशोत्सव संपतो, म्हणुन या दिवसाला अनंत चतुर्दशी म्हटले जाते. चतुर म्हणजे चार आणि दशी म्हणजे दहा.
अनंत चतुर्दशीचा इतिहास
एका पौराणिक कथेनुसार गणपती बाप्पाने महाभारत ग्रंथ लिहला आहे. असे म्हटले जाते की, ऋषी वेद व्यासांनी महाभारत आत्मसात केले होते परंतु ते हा ग्रंथ लिहण्यास असमर्थ होते. हा ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांना अखंड ग्रंथ लिहू शकणाऱ्या दिव्यआत्मा असणाऱ्या व्यक्तीची गरज होती. या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांनी ब्रह्म देवाला प्रार्थना केली. ब्रह्म देवाने सुचवले की, गणपती बुद्धीची देवता आहे ते हा ग्रंथ पुर्ण करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करतील.
त्यानंतर ऋषी वेद व्यास यांनी गणपतीला महाभारत लिहिण्याची विनंती केली आणि त्यांनी त्याला होकार दिला. ऋषी वेद व्यासांनी चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताची कथा सांगण्यास सूरूवात केली आणि गणपती बाप्पा सतत लिहीत राहिले. दहाव्या दिवशी ऋषी वेद व्यासांनी डोळे उघडले. तेव्हा त्यांना दिसले की गणपती बाप्पाच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे. गणपती बाप्पाच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी, ऋषी वेद व्यास यांनी त्यांच्या शरीरावर मातीचा लेप लावला. गणपती बाप्पाच्या शरीराला थंडावा मिळावा यासाठी ऋषी वेद व्यास यांनी लेप सुकल्यानंतर त्यांना नदीत उडी मारायला लावली. तो दिवस अनंत चतुर्दशीचा दिवस होता. यामुळेच गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते, असे मानले जाते.
शुभ मुहूर्त
यावर्षी गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी ६:०३ ते संध्याकाळी ६:०७ पर्यंत आहे. रवियोग सकाळी ६:०३ ते ११:३५ पर्यंत आहे, तर सुकर्म योग सकाळी ६:१२ ते संध्याकाळी ६:१२ पर्यंत आहे.
गणपती विसर्जन करतांना ‘हे’ नियम लक्षात ठेवा
- विसर्जनापूर्वी गणपतीची योग्य पूजा करा.
- गणपतीची पूजा केल्यानंतर, त्याची आरती देखील करा आणि क्षमासाठी प्रार्थना करा.
- गणेशजींना गूळ, ऊस, मोदक, केळी, नारळ, पान आणि सुपारी अर्पण करा.
- गणेश अथर्वशीर्षाचे पठण करा आणि तुमच्या घरात सुख शांती असू द्यावी अशी प्रार्थना करा.
- गणेशजींना नवीन कपडे घालणे, पंचमेवा, जिरे, सुपारी आणि त्यात काही पैसे बांधणे.
- जर तुम्हाला हवन करायचे असेल तर हवन सामग्रीमध्ये जिरे आणि काळी मिरी टाकून हवन करा. तंत्रशास्त्रानुसार ते लाभदायक आहे.
- गणेशजींना प्रार्थना करा ही जागा श्रद्धेने सोडून द्या.
- प्रथम गणेशजींच्या मूर्तीला नमन करा, नंतर पायाला स्पर्श करा, नंतर परवानगी घ्या आणि श्रद्धेने मूर्ती उचला
- शक्य असल्यास, पाण्याची व्यवस्था करून गणपतीच्या मूर्तीचे घराच्या अंगणात विसर्जन करा.
- जर मूर्ती मोठी असेल तर ती बाहेर नदी, तलाव किंवा समुद्रात विसर्जित करा.
- विसर्जनाच्या वेळी गणपतीचा चेहरा समोरच्या दिशेने असावा. आपल्या समोर तोंड करून विसर्जन करू नका.
- गणपती विसर्जनाच्या वेळी बाप्पाचा जयघोष करा आणि ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत गणरायाला निरोप द्या.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






