गणपती विसर्जनावेळी जामनेरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे.
जामनेर :- गणपती विसर्जन करतांना लहान मुलगा पाण्यात बुडतांना पाहून वाचविण्यासाठी गेलेल्या तरूणाचा कांग नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना जामनेर- बोदवड रस्त्यावर घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केले जात आहे. मोहन सारस्वत जामनेर जि. जळगाव : गणपती विसर्जनावेळी जामनेरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लहान मुलगा बुडत असल्याचे पाहून तरुणाने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मुलाला वाचविले, परंतू स्वत:चा जीव मात्र तो वाचवू शकला नाही. या घटनेने सारे जामनेर हळहळले आहे.
किशोर राजु माळी (२७, रा.गणेशवाडी, जामनेर) असे तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. कांग नदीच्या पुलाखाली गणपतींचे विसर्जन सुरु होते. यावेळी किशोरला एक लहान मुलगा पाण्यात बुडत असताना दिसला, त्याला वाचविण्यासाठी किशोरने पाण्यात उडी मारली. त्या मुलाला त्याने वाचविले. परंतू, किशोरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किशोरचा मृतदेह उपजिल्हारुग्णालयात आणण्यात आला. त्यावेळी पत्नी व मुलांनी एकच आक्रोश केला. कांग नदी पात्रातून त्याचा मृतदेह काढण्यात आला.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






