चाळीसगाव :- सध्या देशात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीीचे उत्सवाचे वातावरण असतांनाच चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील १७ वर्षीय मुलाचा गणपती विसर्जन करताना पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी २ वाजता घडली आहे. विसर्जन करताना घडलेली ही जळगाव जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. सौरभ शत्रुघ्न मोरे (वय-१७) असं मृत युवकाचे नाव आहे.
चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक गावात राहणारा सौरभ शत्रुघ्न मोरे (वय-१७) हा आपला भाऊ व आई यांच्यासह वास्तव्याला आहे. लहान मुलांच्या गणपती मंडळात सौरवने भाग घेतला होता. दरम्यान, आज गणेश विसर्जनाच्या कार्यक्रम असल्याने तीन मित्रांसोबत अंबुजा कंपनीच्या मागे असलेल्या डोहात गणपती विसर्जनासाठी तो गेला होता. सौरवने गणपती बुडविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. यावेळी सोबत असलेले दोन मित्र डोहाच्या बाहेर उभे होते.
सौरभला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बडून मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर दोन्ही मित्रांनी आरडाओरड केली. यावेळी खदानीच्या बाजूला काम करणाऱ्या कामगारांनी धाव घेतली. कामगारांच्या मदतीने सौरभला बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याने प्राण सोडले होते.
दरम्यान, गणपती विसर्जनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सौरभ मोरे याच्या पश्चात आई कल्पनाबाई, भाऊ भूषण असा परिवार आहे.
हे वाचलंत का ?
- Viral Video: मार्केटमध्ये एक सुंदर ड्रेस दोन महिलांना आवडला तो घेण्यावरून सुरू झाला वाद मग सुरू झाली तुंबळ हाणामारी पहा व्हिडिओ
- महाविद्यालयाच्या हॉस्टेलच्या बाथरूममध्ये इतर मुलींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ शूट करून तरुणीने क्लिप्स पाठवल्या प्रियकरास, तरुणीस पोलिसांनी घेतले ताब्यात.
- हृदयद्रावक! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हळद सुकण्यापूर्वीच नववधूच्या मांडीवर डोके टेकत नवरदेवाने सोडला प्राण, सर्वत्र हळहळ.
- संघटित गुन्हे करणाऱ्या घरफोडीतील गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद,१लाख ८५ हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त.
- Viral Video:एक्स्प्रेसवेवर तरुणांची सुसाट वेगाने बाईक चालवत जीवघेणी स्टंटबाजी; तोल जाताच कोसळले, मागून आला ट्रक अन् पहा काळजात धडकी भरेल असा व्हिडिओ.