नवी दिल्ली : – सलूनमध्ये तुम्ही ग्रुमिंग करताना विविध उपकरणांचा वापर करत असालच. पण हे करत असताना सावधान! अत्यंत काळजीपूर्वक या उपकरणांचा वापर होतोय ना? याची खात्री करुन घ्या. कारण अचानक एका हेअर ड्रायरलचा स्फोट होऊन त्यात हेअर स्टायलिस्ट आणि ग्राहक असे दोघेही भाजल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Video Hair dryer explosion Customer hair stylists burned in the fire)
एका ट्विटर युजरनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सलूमध्ये केस कापण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाचे केस सुकवण्यासाठी दुकानदार अर्थात हेअर स्टायलिस्ट आपला हेअर ड्रायर प्लगइन करतो. त्यानंतर ड्रायर सुरु करताच शॉर्ट सर्किट होतं आणि त्यामुळं स्फोट होऊन आग लागते. हा स्फोट आणि आग एकाचवेळी भडकल्यानं केस कापणारा आणि ग्राहक असे दोघेही त्यात भाजले गेले.
पहा व्हिडिओ :
दरम्यान, हा व्हिडिओ बांगलादेशातील नारायणगंज भागातील काचपूर इथला असल्याचं सांगितलं जात आहे. स्फोटामागील कारण असंही सांगितलं जात आहे की, सलूनमधील एसीमधील गॅस लीक झाल्यानं त्याचवेळी हेअर ड्रायर सुरु केल्यानं स्पार्क होऊन त्याचा स्फोट झाला.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक युजर्सनं प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये अनेकांनी हा व्हिडिओ धक्कादायक आणि हृदयद्रावक असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी सलूनमध्ये काळजी घेणं गरजेचं असल्याचं म्हटलंय तर अनेक जण हेअर स्टायलिस्ट आणि कस्टमर यांना श्रद्धांजली वाहूनही मोकळे झाले आहेत.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






