सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत त्यांना हिंदुत्त्वाचे दाखले दिले जात आहेत.
अमरावती : – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा गेल्या काहि महिन्यांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. त्यामुळे, त्यांच्या प्रत्येक कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून सोशल मीडियावरही त्याची चर्चा होत असते. ४ दिवसांपूर्वी त्यांनी अमरावतीमधील एका पोलीस ठाण्यात पोलिसांना आक्रमक आणि सडेतोड भाषेत सुनावले होते. अमरावतीत एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर हे वातावरण चांगलच तापलं होतं. या प्रकरणावरून खासदार नवनीत राणा यांच्यासह हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे, सध्या नवनीत राणा मीडियाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यातच, आता त्यांनी केलेल्या गणपती विसर्जनचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनीही हा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर टिका केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालिसा म्हणण्यावरुन राज्यात राजकीय गदारोळ घातलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सध्या चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कधी हिंदुत्त्व, कधी हनुमान चालिसा, कधी लव्ह जिहाद या प्रकरणांवरुन त्यांनी भूमिका घेत सरकारला आणि प्रशासनाला धारेवर धरले होते. यात त्यांना तुरुंगातही जावे लागले. त्यामुळे, नवनीत राणा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यातच, दोन दिवसांपूर्वी झालेल्या गणपती विसर्जनातही त्यांनी बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. या दरम्यान, बाप्पांची मूर्ती विसर्जन करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत त्यांना हिंदुत्त्वाचे दाखले दिले जात आहेत.
हिंदू धर्मानुसार गणपती विसर्जन कसे केले जाते :
विसर्जन विधीमध्ये गणपतीची आरती करून उत्तर पूजा केली जाते. गणपतीवर अक्षता, फुले वाहिले जातात. त्यानंतर मूर्ती हलविली जाते. मूर्तीत प्राणप्रतिष्ठा केल्यावर त्यात गणरायाचे वास्तव्य मानले जाते. ते उत्तर पूजेनंतर मूर्ती हलवेपर्यंतच असते. एवढ्या दिवस श्रध्देने मनोभावे पूजलेल्या या मूर्तीला नंतर पाण्यात एका सुज्ञ व्यक्तीने पाण्यात उतरवून बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करायचे असते. समुद्र तलाव किंवा नदीत अशाप्रकारे हिंदू धर्माप्रमाणे नियम पाळले जातात.
पहा व्हिडिओ :
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही ट्विटवरुन हा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. ठेकेदारांच्या गणेश विसर्जनाची नवीन परंपरा… असे कॅप्शन देत लोंढे यांनी राणा दाम्पत्यांना लक्ष्य केलं आहे.
बाप्पाची मूर्ती विसर्जन करताना पाण्यात फेकायची नसते :
समुद्र नदी किंवा जवळपास नसेल तर विसर्जनाकरिता कृत्रिम कुंड बनवली जातात आणि विसर्जयापूर्वी या कुंडांमध्ये तुळशीची रोपं फुलं सोडली जातात. परंतु हाताने सौम्य पणे गणपती बाप्पाला दोन्ही हाताने एखादी घरातील व्यक्ती किंवा समाज सेवी संस्थेनी नेमलेली व्यक्ती पाण्यात विसर्जन करते. मात्र समुद्र, नदी, तलाव किंवा कृत्रिम कुंड अशा कोणत्याही ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जन करताना पाण्यात फेकायची नसते असं हिंदू धर्म सांगतो. तसे केल्यास तो हिंदू धर्माचा आणि गणपती बाप्पाचा अपमान मानला जातो.
हे वाचलंत का ?
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……