पुणे :- ( Pune accident News ) सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच पुणे – अहमदनगर महामार्गावरील शिक्रापूरजवळ कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की लोक डोळे विस्फारुन बघत राहीले. कंटेनरने कारला अक्षरश: फरफटत नेले आहे. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्या कारला कंटेनरने फरफटत नेले त्या कारमध्ये चार प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात त्यांना कोणतीही हानी झाली नाही. त्यांच्या डोळ्यासमोर साक्षात मृत्यू उभा असल्याचा अनुभव त्यांना आला आहे.
पुणे-नगर हायवेवरील शिक्रापूर इथं हा अपघात घडला. या भीषण अपघातावेळी कारमध्ये एकूण चार प्रवासी होते. या भीषण अपघातातून दैव बलवत्तर म्हणून चारही प्रवासी अगदी थोडक्यात बचावले आहेत. कारमधील एकालाही कोणताही दुखापत झाली.
पहा व्हिडिओ :
पुणे ते अहमदनगर महामार्गावर असणाऱ्या शिक्रापूर फाट्यावर हा भीषण अपघात घडला. व्हिडिओ पाहुन अंगावर काटे येतील अशी ही घटना आहे. दैव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे चारही प्रवासी सुखरूप राहीले.
या घटनेनंतर प्रवासी अजूनही तणावाखाली असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






