पारोळा :- कोरोनाच्या संकटातून कसेबसे सावरत असतानाचा मुक्या प्राण्यांवर म्हणजेच गाय, बैल यांच्यावर आता लंपी स्किन डिसीजज आजाराने हल्ला चढवला असून सर्व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बळीराजाचा जोड दंदा म्हणून पशुपालनाकडे पाहीले जाते. मात्र काही दिवसांपासून लंपी स्किन (Lumpy Skin Disease) आजाराने थैमान घातले असून जिल्ह्यात तब्बल २९ गावात रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे गुरांचे बाजार बंद करण्यात आले आहे.
राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसा अगोदरच जळगाव जिल्ह्यादौऱ्यावर येऊन गेले होते. जिल्ह्याला प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहे. जिल्ह्यात तब्बल २९ गावात रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने मुक्या प्राण्यांवर म्हणजेच गाय, बैल यांच्यावर आता लंपी स्किन डिसीजज आजाराने हल्ला चढवला असून सर्व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बळीराजाचा जोड दंदा म्हणून पशुपालनाकडे पाहीले जाते. मात्र काही दिवसांपासून लंपी स्किन (Lumpy Skin Disease) आजाराने थैमान घातले असून जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सर्वच ठिकाणच्या गुरांचे बाजार बंद करण्यात आले आहे.
जिल्हातील आठ तालुक्यातील २९ गावात जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease) या साथ रोगाचा आजाराचे जनावरे आढळून आल्याने तसेंच या रोगाचा प्रसार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी होणाऱ्या वाहतुकीमुळे जिल्हात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांचेकडील दि ६ सप्टेंबर २०२२ च्या आदेशानुसार पारोळा कृषि उत्पन्न बाजार समिती मुख्य मार्केट यार्डवरील गुरांचा आठवडे बाजार दि.११ पासून पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात येत आहे. तरी शेतकरी बंधूनी आपले गुरे-ढोरे विक्रीस आणू नये असे आव्हान बाजार समितीचे प्रशासक जी.एच.पाटील. सचिव रमेश चौधरी यांनी केले आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






