झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल- शहरासह ग्रामीण भागात हजारो भाविकांच्या उपस्थितीत गणपतीचे शांततेत आणि उत्साहात विसर्जन करण्यात आले.गणपती विसर्जन मिरवणूक सुमारे बारा तास चालली.पहाते पाच वाजता शेवटच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागात सकाळपासूनच गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला होता.दुपारी चार वाजेपर्यंत घागुती आणि लहान गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.पालिकेतर्फे शहरात चार ठिकाणी गणपती व निर्माल्य संकलन केंद्र सुरु करण्यात आले होते.


सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीस दुपारी चार वाजता प्रारंभ करण्यात आला. जयगुरू व्यायाम शाळेचा मानाचा गणपती मिरवणुकीच्या अग्रभागी होता.विसर्जन मिरवणुकीवर ठिकठीकाणी गुलाल आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.विसर्जन मिरवणूक सुरु असतांना पावसाचे आगमन झाल्यामुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.विसर्जन मिरवणूक सुरु असतांना अनेकवेळा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सर्व सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी शिस्तीने लेझीम खेळत होते.मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास पहिल्या गणपतीचे तर सकाळी पाच वाजता शेवटच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.मिरवणुकीत सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी पक्षभेद बाजूला सारून सहभागी झाले होते.कोरोना मुळे दोन वर्षांपासून सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्यामुळे यावर्षी गणेशोत्सव भाविकांनी उत्साहात साजरा केला.सार्वजनिक गणेश मंडळांच्या भव्य व आकर्षक गणेश मूर्ती आणि विविध मंडळांनी सादर केलेले जिवंत देखावे यावर्षाचे गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.

प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसीलदार सुचिता चव्हाण,पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांचेसह सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले होते.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल यांचेसह पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाच्या जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मिरवणुकीत माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,देविदास महाजन,रवींद्र महाजन,राजेंद्र चौधरी,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन,सुनील चौधरी,चिंतामण पाटील,रवींद्र जाधव,माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी,शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन, युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन,भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत महाजन,शहराध्यक्ष आबा चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बबलू चौधरी,अँग्लो उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम,माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र पाटील,योगेश,अभिजित पाटील,प्रमोद महाजन,जगदीश ठाकूर,

जेष्ठ पत्रकार शिवाजीराव अहिरराव, कमरअली सैय्यद,जावेद मुजावर,झुंजार न्यूज चे संपादक संजय चौधरी, कैलास महाजन,राजधर महाजन,नितीन पाटील सर, यांचेसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि हजारो भाविक सहभागी झाले होते.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






