मुंबई, (प्रतिनिधी) : – सध्या महाराष्ट्रात महिला लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी एक घटना मुंबई मधून समोर आली आहे. एका खाजगी ट्युशनच्या शिक्षकाचे धक्कादायक घाणेरडे कृत्य समोर आल्याने खळबळ उडाली आहे, आपल्याच ट्युशन मध्ये शिकणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीवर ५८ वर्षीय शिक्षकाने व्यक्तीने बलात्कार केला. या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैवी शक्ती असल्याचं भासवून केला बलात्कार
शिक्षक असलेल्या आरोपीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासून पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. ऑक्टोबर 2019 च्या पहिल्या आठवड्यात आरोपीने पीडित मुलीला त्याच्या स्वतःच्या घरी बोलावून तिला गुंगीचा प्रसाद दिला. त्यानंतर बलात्कार केला. त्यावेळी पीडित मुलगी ही अल्पवयीन होती.
मोबाईल मध्ये नग्न फोटो काढले…
तरुणीचा बलात्कार केल्यावर नराधम शिक्षकाने मोबाईलमध्ये मुलीचे नग्न फोटो काढून आणि फोटो वायरल करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वारंवार पीडित मुलीसोबत कुर्ला या ठिकाणी आरोपीच्या राहत्या घरी तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
हे वाचलंत का ?
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






