भरधाव वेगाने निघालेला ट्रेलर रस्त्यावर पलटी होऊन झालेल्या अपघातात एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघे कारमधून प्रवास करत असताना ट्रेलर पलटी होऊन त्यांच्या वाहनावर कोसळला. पंजाबमधील बेहराम येथे राष्ट्रीय महामार्गावर झालेला हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
व्हिडीओमध्ये माल भरलेला १८ चाकांचा ट्रेलर रस्त्याने येताना दिसत आहे. मात्र आपला वेग कमी न करता किंवा कोणताही सिग्नल न देता ट्रेलर चालक अचानक वळण घेतो. यावेळी वेगात असलेल्या ट्रेलरचा तोल जातो आणि रस्त्यावर कोसळतो. दरम्यान, ट्रेलर वळण घेण्याची कोणतीही कल्पना नसल्याने रस्त्याने धावणारी तीन वाहनं जाऊन ट्रेलरवर आदळतात. यावेळी ट्रेलर कोसळत असताना एक गाडी त्याच्या खाली येते.
या अपघातात आई, वडील आणि मुलगा यांचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी आहेत.
पोलिसांनी ट्रेलरचा चालक मेजर सिंगविरोधात बेदरकारपणे वाहन चालवण्यासहित इतक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हे वाचलंत का ?
- Viral Video:नवरीला लागली हळद,रात्री नाचताना नवरीच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू,ज्या दिवशी तिचे लग्न त्याच दिवशी निघाली अंत्ययात्रा, दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा
- चुलत दीरासोबत अनैतिक संबंध, पती पत्नीमध्ये वाद, प्रियकराच्या मदतीने पत्नीने शेतकरी पतीचा केला खून; अन् अपघाताच्या केला बनाव.
- घरकुल योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचाने घेतले भिकाऱ्याचे सोंग; पंचायत समिती कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन.
- नवरदेव वऱ्हाडीसह लग्नासाठी मांडवात आला, अचानक मधमाशांनी केला हल्ला,नवरदेव नवरीला घेऊन पळाला,19 वऱ्हाडीं जखमी.
- दुसऱ्या तरुणाशी लग्न का केलं अस म्हणत नवविवाहित दाम्पत्याची कार अडवून नवरीच्या अपहरणाचा प्रयत्न; पण झाले भलतेच….