नंदुरबार :- सध्या महाराष्ट्रात महिला लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच नंदुरबारमधील आदिवासी भागातील धक्कादायक घटना मृत्यूनंतर एक, दोन नव्हे तर तब्बल 42 दिवसांपासून एका पित्याने आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी तिचा मृतदेह मीठाच्या खड्यात पुरुन ठेवला आहे.
मुलीवर 4 जणांनी बलात्कार करुन तिचा खून केला असताना पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोंदवला. ऐवढेच नव्हे तर शवविच्छेदनावेळीही तिच्यावरील अत्याचाराबाबत काहीच तपासणी करण्यात आली नाही, असा आरोप पित्याने केला आहे.
आपल्या मुलीला न्याय मिळावा, यासाठी या पित्याने आता ग्रामस्थांच्या मदतीने व्यवस्थेविरोधात लढा सुरु केला आहे.
1 ऑगस्टरोजी बलात्कार
नंदुरबारमधील धडगाव तालुक्यात राहणाऱ्या पित्याने आपल्या मुलीचा मृतदेह मिठाच्या खड्ड्यात ठेवत तो जतन करुन ठेवला आहे. याबाबत पित्याने सांगितले की, त्यांच्या विवाहीत मुलीला तालुक्यातील वावी येथील रहिवासी रणजीत ठाकरे आणि अन्य एकाने 1 ऑगस्टरोजी बळजबरीने गाडीवर बसवून गावाबाहेर नेले. मुलीनेच नातेवाईकांना फोन करुन रणजीतसह चार जणांनी आपल्यावर कुकर्म केल्याचे सांगितले.
मारून टाकतील’ :
पित्याने सांगितले की , कुकर्मानंतर ते मला मारून टाकतील, असे मुलीने नंतर फोनवर सांगितले. यानंतर काही वेळानेच तिने वावी येथील एका आंब्याच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचा फोन आला. मात्र, मुलीचे कुटुंबीय घटनास्थळी पोहचण्याआधीच वावी गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह उतरुन घेत पुरावे नष्ट करण्यात आले.
आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न :
विशेष म्हणजे मुलीवर बलात्कार झाल्याचे पोलिसांना सांगुनदेखील मुलीच्या शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झाली नाही, असा आरोप पित्याने केला आहे. मुलीला फाशी दिली असून पोलिसांच्या मदतीने ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न चालला असल्याचा आरोप तिच्या वडीलांसह कुटुबीयांनी केला आहे.
ग्रामस्थही कुटुंबासोबत :
शवविच्छदेनाच्या अहवालानंतर पोलिसांनी या घटनेप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला. या प्रकरणात संशयीत रणजीत ठाकरेसह तिंघाना अटक केली. मात्र, केवळ आत्महत्येची नोंद केल्याने मुलीचा मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेहाचे अंतिम संस्कार केले नाही. त्यांनी आपल्या घराशेजारील शेतात खड्डा करुन तेथे मिठातच आपल्या मुलीच्या मृतदेहाला पुरले आहे. या सर्वप्रसंगी खडक्याचे ग्रामस्थदेखील पीडित कुटुंबीयांसोबत उभे आहेत.
मुख्यमंत्री शिंदेंकडेही धाव :
मृतदेह मिठाच्या खड्ड्यात पुरल्यानंतर पित्यासह ग्रामस्थांनी धडगाव पोलिस स्टेशनसह पोलिस अधिक्षक कार्यालय गाठून आपले गाऱ्हाणे मांडले. ठाणे येथील सामाजिक कार्यकर्त्यां परिणीती पोंक्षेंच्या मदतीने थेट मुख्यमंत्री शिंदेंनाही अंतिम संस्कार झाले नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. मुळात मुलींच्या कुटुंबीयांच्या मागण्यानंतर प्रशासनाने मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करणे क्रमप्राप्त होते, मात्र अद्याप यावर कार्यवाही झाली नसल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हण्णे आहे.
पुन्हा शवविच्छेदनची मागणी :
दरम्यान, या घटनेत तपासादरम्यान जे तथ्य समोरआलेत त्यानुसार अतिरीक्त कलमांचा गुन्ह्यात समावेश करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस अधिक्षकांनी ग्रामस्थांचीही भेट घेतली आहे. तसेच, पीडितेच्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करण्याच्या सूचनाही त्यांनी धडगाव पोलिस ठाण्याला दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी तालुका दंडाधिकारी यांना पत्र लिहून पुर्न शवविच्छेदनाची मागणी केली आहे.
ऑडिओ क्लीपची दखल का घेतली नाही ?
पीडितेने मृत्यूआधी कुटुंबीयांना फोन करून आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली होती. याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांनाही माहिती दिली. तेव्हाच पोलिसांनी मुलीच्या मृत्यू आधीच्या व्हायरल ऑडीओ क्लीपची तपासणी करून ठोस पावले उचलणे गरजेचे होते, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हण्णे आहे. तसेच, तिच्या आत्महत्येबाबतच्या फोटोंवरही कुटुंबाने काही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलिस त्याची दखल घेणार का, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
हे वाचलंत का ?
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४