सर्कल मेळाव्यातून वंचितांना सत्तेपर्यंत नेता येईल – रूपचंद गाडेकर.
झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
औरंगाबाद :- वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पच्श्रिम तालुका अंतर्गत वडगाव कोल्हाटी आणि बजाजनगर या दोन जिल्हा परिषद सर्कलचा संयुक्त सत्ता संपादन मेळावा ११ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता हायटेक कॉलेज समोरील ग्राउंड सावरकर चौक बजाज नगर एम आय डी सी वाळुंज येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा या तालुक्यांचे निरिक्षक रुपचंद गाडेकर यांनी कार्यकर्ते यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल निहाय सत्ता संपादन मेळाव्याचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यशस्वी रित्या चालू असुन या मेळाव्यामुळे येथील वंचित समाजाला सत्ते पर्यंत नेण्यास मोठी मदत होणार असल्याचे ते म्हणाले यावेळी औरंगाबाद पुर्व चे जिल्हा महासचिव महेश निनाळे, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भावि गवई यांनीही कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला जिल्हा सदस्य पंडीत तुपे, यांची प्रमुख उपस्थिती होती सदरील मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पच्श्रिम तालुका अध्यक्ष अंजन साळवे हे होते या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक शाहिर मेघानद जाधव,सम्यक विद्यार्थी आंदोलनांचे शहराध्यक्ष संकेत कांबळे, उपस्थित होते.

या मेळाव्यासाठी औरंगाबाद पच्श्रिम तालुका महासचिव एस पी हिवराळे, सुगंध दाभाडे,प्रेम बनकर, सतीश महापुरे, आदींनी परिश्रम घेतले नितीन शेजवळ, अमृता डोगरदिवे,सईद बाबा पठाण, नंदकुमार गाडेकर, संदीप जाधव, तौफिक शेख,सागर तुपे, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अंजन साळवे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष अंजन साळवे ,सिद्धार्थ बनकर,महासचिव एस पी हिवराळे,उपाध्यक्ष सतीश महापुरे अनिल थोरात,प्रेम बनकर,adv सोमनाथ सांगळे, हाशम पटेल , सुगंध दाभाडे,अमोल चव्हाण, अरविंद पवार, अनिल जाधव, दीपक रगडे , आनंद खरात,नितीन घोरपडे ,अशोक त्रिभुवन, ज्ञान शील वाघमारे,अनिल कांबळे, हणमंत नामाकर ,शैलेश गजभिये,सागर त्रिभुवन, या कार्यक्रम साठी अवरजून गंगापूर तालुका अध्यक्ष युनूस पटेल, युवा अध्यक्ष गंगापूर नितीन शेजुळ, शेख तोफीक ,गणेश खोतकर हरदास बोर्ड , बाबासाहेब दूसिंग,भय्यासाहेब जाधव,अशोक कानडे ,विकास रामटेके , एल एल गायकवाड, रामदास बर्फ ,संदीप जाधव, हांनिप पटेल, राहुल बंनसोडे,संदीप रोकडे , अण्णा जाधव, गणेश गाडेकर,शशिकांत गोफने,बालाजी भालेराव,शेख इस्माईल ,अशोक वाहूल ,शुभम साळवे आदी कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला व सत्ता संपादन सर्कल मेळावा यशस्वी केला .सूत्रसंचालन साहेबराव इंगोले तर आभार एस पी हिवराळे यांनी मानले .
हे वाचलंत का ?
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.