उकळत्या तेलात हात घालून महिला वडापाव काढते, अंगावर काटा आणणारा Video
नाशिक : – वडापाव हा महाराष्ट्रातील लोकांचं आवडतं स्ट्रीट फुड आहे. वडापाव प्रिय असणारे लोक तुम्हाल राज्यातील प्रत्येक शहरात मिळतील. त्यामुळे सर्वच शहरात वडापाव विकणाऱ्या गाड्या असतात. असाच एका वडापाव विकणाऱ्या गाडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये वडापाव पेक्षा वडापाव बनविणाऱ्या महिलेची चर्चा जास्त होत आहे. ही महिला चक्क उकळत्या तेलात हात घालत वडापाव काढते. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.
वडापाव कोणाला आवडत नाही…वडापाव म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. मस्त लाल तिखट आणि गोड चटणी सोबतचा गरमागरम वडापाव आता तुमच्या डोळ्यासमोर आला असेलच. इतकंच नाही तर हे वाचून तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी लगेच वडापाव खाण्याचा प्लानही केला असेल…नुकतंच सोशल मीडियावर एक नाशिकचा वडापाव व्हायरल होतोय…
नाशिकचा हा चीज वडापाव आहेच असा स्पेशल…याची अजून एक स्पेशालिटी म्हणजे हा वडापाव तयार करणारी महिला गरम तेलात तळत असणारे वडे हाताने बाहेर काढताना दिसतेय. नाशिकच्या व्हायरल होणाऱ्या या वडापावच्या व्हिडीयोने अनेकांच्या जीभेला पाणी सुटलं असेल.
सध्या या महिलेचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. इन्स्टाग्रावर एका फूड ब्लॉगरने हा व्हिडीयो तयार केला आहे.
हा गरम गरम वडा खाण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत नागरिकांची गर्दी असते. तुम्हीही पुढच्यावेळी नाशिकचा दौरा करणार असाल हा वडापाव नक्की टेस्ट करा.
हे वाचलंत का ?
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.