पुणे :- पुण्यात लैंगिक शिक्षणाच्या( sex education Trening ) प्रशिक्षणाची ऑनलाईन बुकींग ( Online Buking ) सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रशिक्षणाचे ऑनलाईन बुकिंग केलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रशिक्षणाने याबाबत एक जाहिरात केली आहे. या जाहिरातीचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशनच्या वतीनं या प्रशिक्षणाची जाहिरात करण्यात आल्याचे समजते. पुणे शहरात नवरात्र उत्सावाच्या निमित्ताने तरुणांना लैंगिक प्रशिक्षण देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सत्यम शिवम् सुंदरम् या फाउंडेशनच्या वतीने सेक्स तंत्र नावाने या प्रशिक्षणाचे ऑनलाईन बुकींग करण्यात येत आहे.
लैंगिक प्रशिक्षण देण्यासंदर्भात जाहिरात आणि मेसेज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. या लैंगिक शिबिराचे आयोजन १, २ आणि ३ ऑक्टोबर २०२२ दरम्यान करण्यात आले आहे. यात तरुण आणि तरुणी सहभाग घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या लैंगिक प्रशिक्षण शिबीरात धान्यधारणा कशी करावी आणि कामसुत्रातील लैंगिक क्रिया या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण शिबिरासाठी प्रत्येकी १५ हजार रुपये फी आकारली जाणार आहे. या बाबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या की, लैंगिक प्रशिक्षणाच्या नावाखाली हे सेक्स रॅकेट आहे. यासंदर्भात ऑनलाईन जाहिरात कऱण्यात आली आहे. यावर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. याचा नवरात्रीशी काहीही संबंध नसल्याचं रुपाली पाटील यांनी म्हटलं.
नवरात्रोत्सवादरम्यान या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेक पुणेकरांनी यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अशा पद्धतीने लैंगिक शिक्षणाचे प्रशिक्षण देता येते का? सहकारी संस्था अशा प्रकारचे प्रशिक्षण देऊ शकतात का? या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सकाळी ही जाहिरात व्हायरल झाली. यानंतर पुणे पोलिसांकडे कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सेक्स एज्युकेशन किंवा लैंगिक शिक्षण देणार असतील तर ते डॉक्टरांकडून दिले जावे. मात्र, आयोजकांमध्ये डॉक्टर नसल्याची माहिती समोर येत आहे.
सेक्स रॅकेट चालण्यासाठी ही नवीन युक्ती शोधून काढली आहे. मात्र अशा प्रकराचं शिबीर आम्ही पुण्यात होऊ देणार नाही. जर लैंगिक शिक्षणाचे धडे द्यायचे असेल तर त्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर असतात. शिवाय त्यावर वयाची अट टाकण्यात आली नसल्याचही रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का ?
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……