जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
स्वपराक्रमाने कार्य सिद्धीस न्याल. नवीन कामास दिवस अनुकूल आहे. जुने करार मार्गी लागतील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. गृह सजावटीच्या वस्तु खरेदी कराल.
वृषभ :-
अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता. आपल्या स्मरणशक्तीचा योग्य ठिकाणी उपयोग होईल. नवीन योजनेवर काम चालू करावे. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. सामाजिक बांधीलकी जपावी.
मिथुन :-
आपल्या कर्तबगारीवर कामे मिळवाल. छोटे प्रवास घडतील. रचनात्मक कमर करण्यावर भर द्यावा. अति विचारात अडकून पडू नका. वरिष्ठ सहकार्यांचे चांगले सहकार्य लाभेल.
कर्क :-
अति चौकसपणा दाखवू नका. परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. मेहनतीचे तात्काळ फळ मिळेल. घरातील प्रलंबित कामे मार्गी लावाल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल.
सिंह :-
आपल्यावर सद्गुणांच्या कौतुकाचा वर्षाव होईल. आपल्या व्यासंगाचा फायदा होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. प्रेमातील व्यक्तींचा उत्साह वाढेल.
कन्या :-
आपले विनयशील वागणे लोकांना आवडेल. योग्य शिस्तीचा फायदाच होईल. भावंडांशी चर्चेतून मार्ग काढावा. कामाचा ताण जाणवेल. कार्यालयातील कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल.
तूळ :-
हातातील काम शेवटपर्यंत लावून धरा. तुमच्या वागण्याचा प्रभाव पडेल. गोड बोलून कामे साध्य करून घ्याल. काही समस्या चर्चेतून सोडवाव्या. नवीन ऊर्जा व उत्साह वाढेल.
वृश्चिक :-
जुन्या प्रश्नातून मार्ग काढावा. अति मसालेदार पदार्थ खाऊ नका. कामाच्या नवीन संधीचा फायदा घ्या. नोकरदार वर्गाने कामात नाविन्य आणावे. उत्साहाने कार्यरत राहाल.
धनू :-
कार्य पूर्ण करण्यात कुशलता मिळवाल. व्यापारी वर्गाला उत्तम दिवस. चुकून एखाद्यावर अति विश्वास ठेवाल. जोखीम पत्करल्यास लाभ मिळू शकतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील..
मकर :-
हातातील कामांची यादी पूर्ण होईल. घरातील काही खर्च निघतील. तज्ञांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढाल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
कुंभ :-
कल्पनेतून बाहेर येऊन कामाला लागावे. जुन्या कामावर खर्च होईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. समाजसेवा करण्याची संधी मिळेल. जोडीदाराशी मतभेद दूर होतील.
मीन :-
सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. खर्चाचा अंदाज बांधावा. व्यापारातील जोखीम सकारात्मक परिणाम देईल. सर्व समस्या टप्याटप्याने सुटतील. जोडीदाराच्या भावनेचा व मतांचा आदर करावा.
हेही वाचलंत का ?
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.
- रस्त्याने जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर ठार मारेन; धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक.
- निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू.
- अल्पवयीन मुलीशी केली मैत्री,फूस लावून बसविले एक्स्प्रेसमध्ये अन् धावत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये नेऊन नराधमाने केला लैंगिक अत्याचार.