झुंजार प्रतिनिधी पारोळा
शहरात विजेची समस्या ऐरणीवर आली आहे. दिवसभरात तब्बल १० ते १५ वेळा लाईट चालू बंद होते.यामुळे अनेक कामांना ब्रेक लागून अनेकांचे टीव्ही,कॉम्पुटर,लॅपटॉप खराब झाले आहेत.ब्राह्मोत्सव पर्यत विजेची समस्या न सुटल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शिवछावा संघटनेचे सागर भोसले यांनी दिला आहे.
विजेची समस्या गंभीर बनली आहे.अनेक कामांना ब्रेक लागला आहे.दिवसातून अनेकदा लाईट चालू बंद होत असल्याने टीव्ही,लॅपटॉप,कॉम्पुटर्स,पंखे खराब झाले आहेत.परिणामी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.लाईट केव्हा येणार.? काय समस्या आहे.? चौकशीसाठी वीज वितरण कर्मचारी अधिकारी यांना फोन केले तर उचलत नाहीत.असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
परिणामी लाईट गुल अधिकारी कर्मचारी मश्गुल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.विजेचा लपंडावाने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ब्राह्मोत्सव पर्यत विजेची समस्या न सुटल्यास तीव्र निषेध नोंदवून आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी,तालुकाध्यक्ष गणेश पाटील,शहराध्यक्ष ईश्वर पाटील,मनोज खत्री,लोकेश महाजन उपस्थित होते.
–वीज समस्येवर स्वाक्षरी मोहीम
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या अनेक कामांना ब्रेक लागला आहे.तर काहींची विद्युत उपकरणे देखील खराब झाली आहेत.सततच्या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे परिणामी तरुणाईकडून या वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवून अधिकाऱ्याना निवेदन देवून तक्रारींचा पाढा वाचण्यात आला.ब्राह्मोत्सव पर्यत समस्या न सुटल्यास जनतेच्या रोषास सामोरे जावे लागेल असा सज्जड दम तक्रार समनव्यक राहुल निकम यांनी भरला.यावेळी माजी नगरसेवक दीपक अनुष्ठान, डाँ.चेतन करोडपती,गौतम जावळे, निंबा मराठे आदी उपस्थित होते.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






