अजित पवारांनीही पहाटे शपथ घेतली होती, मग त्यांनाही गद्दार म्हणायचे का ?: गुलाबराव पाटील

Spread the love

जळगाव :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच राजकीय नेते एकमेकांनवर आरोप प्रत्यारोप करत आहे अश्यातच राज्याचे विरोधी पक्षाचे नेते अजित पवार यांनी कालच्या जळगावातील मेळाव्यात शिंदे सरकार व त्यांच्या आमदारांवर जोरदार टीका केली होती. यावर शिंदे गटातील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार उत्तर दिले आहे. अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहेत. टीका करणं त्यांचं काम आहे. पण अजित पवार यांनीही सकाळचा शपथविधी केला होता. मग आम्ही पण त्यांना गद्दार म्हणायचं का, असा खोचक सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. ते शुक्रवारी जळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली, साडेतीनशे कोटी रुपये जळगाव जिल्ह्यासाठी मिळाले हे पण त्यांनी मान्य करायला पाहिजे. मात्र त्यांनी आम्हाला गद्दार म्हटले आहे, ते आम्हाला मान्य आहे, पण अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहे, सरकारच्या चांगल्या व वाईट अशा दोन्ही गोष्टी सांगण्याची जबाबदारी त्यांची होती. त्यांनी फक्त त्यांनी फक्त सरकारवर टीका केली, सरकारच्या चांगल्या कामाबद्दल अजित पवार यांनी ऊहापोह त्यांनी केला नाही, असे यावेळी मंत्री पाटील म्हणाले.

‘माझ्या विरोधात दोन गुलाबराव फिरताहेत, दोन्ही आतापासून आमदार झालेले आहे’

कोणती जागा कोणाला दिली जाणार नाही हे, त्यांना माहित नाहीये, आता जळगाव ग्रामीण मतदारसंघात पाच वेळा शिवसेनेचा उमदेवार निवडून आला, ही जागा राष्ट्रवादीला जाणार आहे का? हा सवालही मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. पाचही ठिकाणी शिवसेनेचे आमदार , या पाचही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले आहे, मग याठिकाणी राष्ट्रवादीचे कि शिवसेनेचे उमेदवार हे त्यांच्या पायदनात पाय नाहीये, असा टोलाही मंत्री पाटील यांनी लगावला.

माझ्या विरोधात दोन गुलाबराव फिरताहेत, दोन्ही आतापासून आमदार झालेले आहे, आता त्यांनी ठरवाव की त्यांचा खरा नवरदेव कोण हे त्यांच त्यांच्या मध्ये ठरत नाही, असे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकीकडे महाविकास आघाडीला तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर व शिवसेनेचे गुलाबराव वाघ या दोघांना टोला लगावला. त्यांचा प्रॉपर उमेदवारच ठरच नाहीये, प्रॉपर मतदारसंघ ठरलेला नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुकीमध्ये अजून त्यांची युती पक्की झालेली नाही. तर आमदारकीच्या निवडणुकीत कोण पाहिली आहे असे सांगत मला नाही वाटतं की, विधानसभेत महाविकास आघाडी म्हणून तीनही पक्ष निवडणुका लढतील, असेही मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार