धरणगाव ( पिंप्री ) : – फोटोग्राफी ने दुनियेला आज जवळ आणलं त्यातून मनात असलेली कल्पना प्रत्यक्षात अवतरली आज फोटोग्राफीचा सर्वत्र बोलबाला असताना त्यात आधुनिकता देखील स्विकार झाली . 19 ऑगस्ट रोजी फोटोग्राफी दिवसाचे औचित्य साधत पिंप्री खु येथील धरणगाव तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशन यांनी एकदिवसीय वर्कशॉपचे आज दिनांक 18 सप्टेंबर रविवारी आयोजन केले होते . निळकंठेश्वर हायस्कूल चावलखेडा येथील विद्यालयात मल्टिपर्पज हॉल मध्ये झाला . प्रसंगी या वर्कशॉपला धुळे येथील सुप्रसिद्ध ट्रेनर म्हणून संजय गवळी सर आणि त्यांची टीम यांनी प्रमुख माहिती दिली .यासाठी मेकअप आर्टीस्ट लिना ठाकूर धुळे , मॉडेल प्रतिक्षा नरवाडे जळगाव , आशिष तडवी जळगाव यांची विशेष प्रात्यक्षिक मध्ये महत्वाची भूमिका पार पाडली .यात वेडिंग प्री वेडिंग कॅन्डीड ,लायटनिंग ,मॉडेलिंग , तसेच अधुनिक माहिती देत उपस्थित फोटोग्राफर बांधवांना प्रेरित केले.

एकदिवसीय वर्कशॉप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दत्ता पाटील (जळगाव) यांनी भुषवले .तसेच सुरवातीला प्रतिमा पूजन करण्यात आले. तदनंतर सर्व तालुक्यांचे फोटोग्राफर अध्यक्ष यांचे स्वागत करण्यात आली वर्कशॉप साठी जळगाव ,धुळे ,नाशिक ,नंदुरबार (खान्देश) मधील शेकडो फोटोग्राफर बांधव उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी
धरणगाव तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पाटील , उपाध्यक्ष जे डी पाटील, सचिव विजय पाटील सह सचिव,प्रकाश लोखंडे तसेच असोसिएशन सभासद ,वैभव चौधरी ,श्याम पाटील ,गोपाल पाटील ,अमोल पाटील ,मोहन पाटील ,चेतन गुंजाळ ,पवन चौधरी ,भटू पाटील ,निलेश पाटील ,गुलाब पाटील ,ऋषिकेश इंगळे ,अनिल महाजन आदींनी परिश्रम घेतले.पवन पाटील, सिद्धांत लोखंडे, ललित पाटील, शुभम पाटील, विशाल पवार, विनोद पाटील, तेजस झावरे, आश्विन गुंजाळ, दीपक बडगुजर,
सूत्रसंचालन गोपाल पाटील व भटू देसले यांनी केले तर आभार प्रमोद सांदनशिव, सागर शिरसाठ यांनी केले. एकदिवसीय वर्कशॉप उत्साहात संपन्न झालाा.
हे वाचलंत का ?
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.