सोयगाव, दि.१९…अल्पशा आजाराने एका महीलेचा शेतात मृत्यु झाला असुन मृतदेह गावात आणण्यासाठी मुसळधार पावसामुळे तब्बल आठ तासानंतर गावातील काही तरुणांच्या मदतीने मृतदेह गावात आणल्याची सोयगाव तालुक्यातील तिडका येथे घटना घडली ….
तिडका येथील अकबर शहा हे आपल्या कुटुंबा सोबत गावापासून दोन की.मी.अतंरावर असलेल्या शेतातच वास्तव्यास आहे
अकबर शहा यांची पत्नी हापीजा शहा यांचे आज सकाळी चार वाजता अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या दफनविधी गावातील कब्रस्थानमध्ये करायचे आहे परंतु तिडकासह परीसरात सायंकाळच्या सात वाजेपासुन जोरदार पाऊस सुरू असुन नदी नाल्यांना मोठा पुर आला आहे
व पावसाचे खडंण नाही काही तासाने पाऊस बंद होवुन नदी नाल्यांचे पाणी कमी झाल्याने तब्बल आठ तासानंतर एमआयएमचे तालुकाध्यक्ष शेख रईस शेख रशीद,अमीर हसन पठान,अफजल खान मोहम्मद,जमीर हारून पटेल,राजू मस्ताना पटेल, आशु मजीद पटेल यांच्या मदतीने मृतदेह गावात आणुन दफनविधी करण्यात आली