अमळनेर । प्रतिनिधि
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे पादुका दर्शन सोहळा गुरुवार दि.२२ सप्टेंबर रोजी रंजनी रघुनाथ केले यांची मैदान,दाजीबा कॉलनी,बेटावट नरडाणा रोड अंमळनेर जि जळगाव येथे होणार आहे.पश्चिम जळगाव स्व-स्वरूप संप्रदाय यांच्या वतीने या पादुका दर्शन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज ( दक्षिण पीठ,नाणीजधाम महाराष्ट्र ) संस्थानाच्या सामाजिक उपक्रमासह महापूर,भूकंप आदी नैसर्गिक आपत्तीत तसेच गत कोरोना महामारीच्या काळातही मोलाचे योगदान आहे.
कोरोनाच्या (कोविड १९ ) आपत्तीप्रसंगी पश्चिम जळगाव स्व-स्वरूप संप्रदाय यांच्या वतीने मदत
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे १) मा.मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दि.१ एप्रिल २०२० रोजी देण्यात आली. २) मा पंतप्रधान सहायता निधीसाठी ५२ लाख रुपयांची आर्थिक मदत दि.३० एप्रिल २०२० रोजी देण्यात आली.३) रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाला दहा लाखाच्या धनादेश दि.१५ जून २०२२ रोजी जिल्हा पोलीस अधिकारी प्रवीणजी मुंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता ४) रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला १५ लाखाच्या धनादेश दि.२२ जून २०२० रोजी सुपूर्द करण्यात आला होता.
मरणोत्तर देहदान
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचा मरणोत्तर देहदान हा उपक्रम जनमानसामध्ये अत्यंत प्रभावी पणे यशस्वी होत आहे. सप्टेंबर २०१६ ते जून २०२२ या कालावधीत २६ मरणोत्तर देह समाजाच्या सेवेसाठी शासकीय मेडिकल कॉलेजला सुपुर्द करण्यात आले आहेत.तसेच
“ब्लड इन नीड” ह्या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या रुग्णांना रक्ताची गरज भासली आहे अशांनी ९६१९१७१००४ ह्या नंबर वरती संपर्क साधून त्या त्या ठिकाणी रुग्णांना या उपक्रमातून तात्काळ मदत झाली आहे.आजपर्यंत १७,७२० रुग्णांना रक्त उपलब्ध करून त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
रुग्णवाहिका सेवा उपक्रम
मुंबई-गोवा,मुंबई-आग्रा मुंबई-अहमदाबाद, पुणे-बेंगलोर, मुंबई-हैद्राबाद,रत्नागिरी-नागपूर आदी ठिकाणी १२ वर्षापासून ३७ रुग्णवाहिका २४ तास कार्यरत असून आतापर्यंत १७ हजार हून अधिक जखमींचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.