अहमदनगर : – सध्या गाजत असलेला सुप्रसिद्ध मराठी चित्रपट “चंद्रमुखी”, या चित्रपटातील अतिशय गाजलेली लावणी, जी गायिली आहे, सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल, आणि या लावणीतील नृत्यांगना आहे. सर्वांची आवडती अशी, अमृता खानविलकर अल्पावधित रसिकांच्या पसंतीला हे गाणं उतरलं आहे. हे गाणं शाळेतील एका विद्यार्थ्यांन गायलं असून संपूर्ण महाराष्ट्राला या विद्यार्थ्यांच्या आवाजानं वेडं लावलं आहे या गाण्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यांपैकी काही व्हिडीओ हे इतके मनोरंजक असतात की ते पाहण्यात आपल्या तासनतास वेळ कसा निघून जातो, हे आपलं आपल्यालाच कळत नाही. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याने अख्ख्या महाराष्ट्राल वेड लावलं आहे.
हा व्हिडीओ एका शाळकरी मुलाचा आहे. ज्याचं गाणं तुमच्या कानावर पडताच तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहाणार नाही. हा मुलगा आपल्या वर्गात गाणं गताना दिसत आहे. हा मुलगा लावणी गात आहे. त्याच्या आवाजात अशी काही जादू आहे की तुम्ही त्याचं गाणं संपूर्ण ऐकण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार या व्हिडीओमधील मुलाचं नाव जयेश खरे आहे आणि तो नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील करजगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत आहे. कुठली पार्श्वभूमी नाही की कुठलं संगीताचं शिक्षण नाही, तरी देखील या मुलानं जे गायलं त्याला तोड नाही.
इथे पहा व्हिडिओ :
खरंच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या या मुलाच्या टॅलेंटला मानावं लागेल. ग्रामीण भागात जिथे बऱ्याच ठिकाणी भौतिक साधन सुविधा नाहीत, अशा ठिकाणी असा हिरा सापडणं आणि त्याची पारख होणं अवघड आहे. परंतू एका शिक्षकानं या विद्यार्थामधील हे अप्रतिम टॅलेंट ओळखलं आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. जो लोकांना फारच आवडला.हा व्हिडीओ काहीच तासाच सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे. ज्यावर लोक भरभरुन लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
हे वाचलंत का ?
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.