सोयगाव, दि.२०..जिल्ह्यातील ८५० ग्राम पंचायती मधून सोयगाव तालुक्यातील जरंडीच्या ग्रामसेवकाचा आदर्श घ्या असा थेट सल्लाच मुख्यकार्य कारी अधिकारी डॉ. निलेश गटणे यांनी मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामसेवकांना दिला आहे. तापडिया सभागृह,औरंगाबाद येथे झालेल्या “राष्ट्नेता ते राष्ट्रपिता” या कार्यक्रमात मुख्यकार्य कारी अधिकारी डॉ गटणे बोलत होते,
सोयगाव तालुक्यातील जरंडीच्या ग्रामसेवक सुनिल मंगरुळे यांनी जिल्ह्यात आदर्श घडवून हिवरेबाजार, पाटोदा या ग्रामपंचायती प्रमाणे विकास घडविला आहे त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामसेवकांनी जरंडी ग्रामपंचायतचा झालेला विकास बघावा असाही सल्ला ग्रामसेवकांना दिला असून जरंडी चे ग्रामसेवक सुनील मंगरुळे हे जिल्ह्यात उत्कृष्ट ग्रामसेवक ठरले आहे असा शिक्कामोर्तब मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ निलेश गटणे यांनी केला आहे..
व इतर विषयांचे आढावा बैठकीत मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील 850 ग्रा पं मधील ग्रामसेवकांमध्ये सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रा पं चे ग्रामविकास अधिकारी आपले सर्वांचे मित्र सुनील मंगरूळे यांचे काम जिल्ह्यात एक नंबर असल्याचे सांगितले व त्यांचे तोंडभरून कौतुक केले..

छायाचित्र ओळ–ग्रामसेवक सुनील मंगरुळे ग्रामीण विकासाचे अनुभव कथन करतांना… मराठवाडा संपादक