जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
आळस झटकून कामाला लागा. योजना यशस्वी झाल्याचा आनंद मिळेल. लांबणीवर पडलेली कामे पूर्ण होतील. प्रवासातून लाभ संभवतो. सहकार्यांशी मतभेदाची शक्यता.
वृषभ :-
आवडीचे पदार्थ खाल. आर्थिक योजना पूर्ण होतील. दिवस मध्यम फलदायी राहील. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मिथुन :-
फसवणुकीपासून सावध रहा. धरसोड वृत्ती कमी करावी॰ एखादी घटना मन खिन्न करू शकते. चांगल्या कामाचे पुण्य पदरात पडेल. दिवसभर कामाची धांदल राहील..
कर्क :-
दिवसाचा बहुतांश वेळ मजेत जाईल. ग्रहांची अनुकूल स्थिती लाभदायक ठरेल. हातातील कामे विनासायास पूर्ण होतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. थकवा दूर होईल.
सिंह :-
साधे आणि सरळ जीवन मार्गक्रमीत कराल. सतत आशावादी राहावे. महत्त्वाच्या कामाच्या नोंदी तपासून पहाव्यात. नियोजित कामे पूर्णत्वास जातील. संमिश्र घटनांचा दिवस.
कन्या :-
दुसर्यांच्या उपयोगी याल. लोक तुमचा सल्ला विचारात घेतील. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. दूरच्या नातेवाईकांची खुशाली समजेल. जुन्या मित्रांच्या भेटीचा योग येईल.
तूळ :-
तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. आत्मविश्वास वाढीस लागेल. लोक तुमच्याकडे प्रभावित होतील. झोपेची तक्रार जाणवेल. नातेवाईकांमध्ये सलोखा जपावा.
वृश्चिक :-
उगाच चिडचिड करू नये. संयमी भूमिका घ्यावी. मुलांसोबत दंगामस्ती कराल. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. कामाच्या बाबतीत सतर्क राहावे.
धनू :-
आज ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. सरकारी कामे अधिक वेळ खातील. नवीन मित्र जोडले जातील. तरुणांच्यात सामील व्हाल. एखादा चांगला अनुभव गाठीशी बांधाल.
मकर :-
जुन्या गोष्टींची खिन्नता बाळगू नका. जवळचा प्रवास कराल. कौटुंबिक मतभेद टाळावेत. कामाचे नवीन धोरण ठरवावे. काटकसरीपणा अंगी बाळगावा.
कुंभ :-
आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल. जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. भागिदारीतून लाभ मिळेल. मनाची चंचलता जाणवेल.
मीन :-
दिवस मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या गोष्टी करण्याकडे कल राहील. बोलतांना शब्दांचे वजन लक्षात घ्या. आजचा दिवस उत्तम फलदायी राहील. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील.
हेही वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






