झुंजार । प्रतिनिधी (योगेश पाटील)
धरणगाव :- धरणगाव शहर शिवसेने तर्फे आज बुधवार रोजी अनोखे जोडे मार आंदोलन करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की रामदास कदम यांनी महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे,सौ.रश्मीताई ठाकरे व आदित्य साहेबांन विषयी बेताल वक्तव्य केले होते त्या अनुषंगाने ठीक ठिकाणी जोडे मार आंदोलन करण्यात येत असून
धरणगाव तालुका शिवसेने तर्फे विविध घोषणाबाजी करीत तमाम पदाधिकारी व शिवसैनिकांनी जोडे मारत आपला रोष व निषेध व्यक्त केला. या प्रसंगी शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ, जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, मा.नगराध्यक्ष. निलेश चौधरी,राजेंद्र ठाकरे, नगरसेवक वासुदेव चौधरी,
भागवत चौधरी, सुरेश महाजन,अहमद पठाण,जितेंद्र धनगर,शरद माळी, धीरेंद्र पुरभे,गजानन महाजन,बापू महाजन,छोटू जाधव,कमलेश बोरसे,भरत महाजन,संतोष सोनवणे,विनोद रोकडे,राहुल रोकडे,अरविंद चौधरी, छोटू भाऊ चौधरी,पप्पू सोनार व तमाम शिवसैनिक ह्या जोडे मार आंदोलनात उपस्थित होते
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






